मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर'....ट्रेलर बघून घ्या भाऊ !!

Subscribe to Bobhata

“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटाचे यापूर्वी २ टीझर येऊन गेले. टीझर मधून चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या सोनेरी कारकिर्दीला कशा प्रकारे रंगवलंय याची एक झलक मिळाली होती. याचाच पुढचा भाग म्हणजे काल आलेला ट्रेलर. 

तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला जात नाही म्हटल्यावर ‘संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक; ज्याची जरब खुद्द औरंगाजेबलाही बसली.’ असं म्हणत आपण त्यांच्या सारखे दिसत नसलो तरी फक्त आपल्या अभिनयातून छत्रपती संभाजी जिवंत करू असा ठाम विश्वास असणारा सुरुवातीचा काशिनाथ ते शेवटी दारूच्या आहारी गेलेला एकेकाळचा सुपरस्टार असा हा प्रवास असणार आहे. काशिनाथ घाणेकर नावाच्या सुपरस्टारचा उदय आणि अस्त कसा झाला याची कहाणी चित्रपटात पाहायला मिळेल.

सुबोध भावेने जिवंत केलेला काशिनाथ घाणेकर अफलातून आहे. प्राध्यापक वसंत कानेटकर, मास्टर दत्ताराम, सुलोचना दीदी, भालजी पेंढारकर, प्रभाकर पणशीकर यांच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत. ट्रेलरच्या शेवटी सुमित राघवनने साकारलेला ‘श्रीराम लागू’ यांचा रोलही प्रॉमिसिंग वाटतो. एकूण चित्रपट प्रॉमिसिंग असेल हे ट्रेलर मधूनच समजतं.

चला तर आता तुम्ही सुद्धा “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चा ट्रेलर बघून घ्या. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका राव.

सबस्क्राईब करा

* indicates required