रामू आला रे आला...'सरकार 3' चा ट्रेलर आलाय भिडू!!!

Subscribe to Bobhata

रामू या टायमाला ‘गोविंदा.. गोविंदा.. गोविंदा..’ म्हणत पुन्हा एकदा ‘सरकार’ घेऊन येत आहे. कालच ‘सरकार ३’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सरकारच्या दुसऱ्या भागानंतर जवळ जवळ दहा वर्षांनी  तिसऱ्यांदा 'गॉडफादरचा इंडिअन' अवतार प्रदर्शित होणार आहे.


अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सुभाष नागरेच्या रोल मध्ये ‘मी मागे हटणार नाही…’ असे अस्खलित मराठी संवाद बोलताना दिसणार आहे. दमदार अभिनय आणि भरपूर अॅक्शनने भरलेला हा सिनेमा वर्ष गाजवणार असे ट्रेलर पाहूनच वाटत आहे. 


या तिसऱ्या भागात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय आणखी काही बडे कलाकार दिसून येत आहेत, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, यामी गौतम. यात ‘अमित सध’ या अभिनेत्याने सुभाष नागरेच्या (अमिताभ बच्चन यांच्या) नातवाची भूमिका केली आहे. 


७ एप्रिल २०१७ ला हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवायला येतोय. आधीच्या सरकारपेक्षा हा वेगळा ठरणार का ? रामूचं सरकार राज्य करणार कि पडणार ? ट्रेलर बघा आणि तुम्हीच ठरवा...


 

सबस्क्राईब करा

* indicates required