computer

कोरोनाचा शिरकाव न झालेली दोन बेटे पर्यटनासाठी खुली होत आहेत, पण एकावर तुम्ही फिरु शकता पण राहू का शकत नाही?

जगभरात कोरोनाचे थैमान कमी झाल्याने आता पर्यटन पुन्हा सुरू झाले आहे. अनेकजण दोन वर्षे कुठेही गेले नव्हते ते आता काही दिवस तरी पर्यटन करण्यासाठी उत्सुक आहेत. जगभर थैमान घातलेल्या या विषाणूने काही मोजक्या ठिकाणी शिरकाव केलेला नाही. युकेमधल्या दोन बेटांवर कोविड पोहोचला नव्हता. ती बेटे आता पर्यटनासाठी खुली होत आहेत. पर्यटकांना इथे जातात येणार आहे व सुटीचा आनंद लुटता येणार आहे. निसर्गाची उधळण असलेली ही बेटे कोणती आहेत? असा प्रश्न तर पडलाच असेल..

पहिल्या बेटाचे नाव आहे सेंट हेलेना. इथे कोरोनाव्हायरसचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. आफ्रिकेतल्या अंगोलाच्या पश्चिमेला सुमारे १२०० मैल आणि दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलच्या पूर्वेला २५०० मैल अंतरावर सेंट हेलेना बेट वसलेले आहे. येथील लोकसंख्या सुमारे ४,५०० लोकांची आहे. सेंट हेलेना बेट ब्रिटीश ओव्हरसीज टेरिटरी ऑफ सेंट हेलेना, एसेन्शन आणि ट्रिस्टन दा कुन्हाचा भाग आहे. २०१६ मध्ये या बेटावर विमानतळ होण्यापूर्वी बेटावर जाण्याचा एकमेव मार्ग समुद्रमार्गे होता. नंतर विमानतळ झाल्यावरही धावपट्टीच्या मार्गावर जास्त वाऱ्यांमुळे ते सुरक्षित आहे की नाही याची वारंवार चाचणी घेण्यात आली. त्यासाठी बराच खर्च यूके सरकारला करावा लागला. अखेर अनेक चाचणी उड्डाणांनंतर विमानतळ वापरण्यासाठी सुरक्षित म्हणून पास करण्यात आले. आणि ऑक्टोबर २०१७ पासून इथे व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली.

इथले निसर्ग सौन्दर्य अगदी पाहण्यासारखे आहे. या बेटावर अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. इथे समुद्री मासेमारी, डायव्हिंग, हायकिंग केले जाते. इथले वातावरण उबदार असते. विशेष म्हणजे या बेटावर ५०० पेक्षा अधिक प्रजातींच्या वनस्पती आणि प्राणी आहेत आणि त्या इतर कोठेही आढळत नाहीत. त्यामुळे निसर्ग अभ्यासक इथे मुक्कामी येतात. २०१९ मध्ये केवळ एका रात्रीत सेंट हेलेनाला ५,१३५ पर्यटकांनी भेट दिली. पण २०२० पासून ही संख्या रोडावून अर्ध्यावर आली. आता परत इथे पर्यटक पहायला स्थानिक उत्सुक आहेत. इथे बरीच खाजगी हॉटेल्स उपलब्ध आहेत. असे म्हणतात की नेपोलियन बोनापार्टने हे बेट विकसित केले आणि इथेच १८२१ मध्ये त्याचे निधन झाले.

सेंट हेलेनाला दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथून उड्डाणे आहेत, परंतु तिथल्या कोरोनाव्हायरस निर्बंधांमुळे हे मार्ग अजूनही थांबलेले आहेत. त्याऐवजी सेंट हेलेनाला सध्या टायटन एअरवेज चार्टर फ्लाइटद्वारे दर तीन आठवड्यांनी लंडन स्टॅन्स्टेड विमानतळावरून सेवा दिली जाते.

आणखी एक दुर्गम आणि कोविडमुक्त ब्रिटिश बेट म्हणजे दक्षिण जॉर्जिया! हे बेट आहे दक्षिण अटलांटिकमध्ये. फॉकलँड बेटांपासून ८०० मैल पूर्वेला हे बेट वसले आहे. याचा आकार १,३६२ चौरस मैल आहे. हा ब्रिटीश ओव्हरसीज टेरिटरी आणि युरोपियन युनियनचा एक परदेशी प्रदेश आहे. १७७५ मध्ये कॅप्टन कुकने हे आयलंड पहिल्यांदा पाहिले होते. त्यानेच त्याचे नाव किंग जॉर्ज तिसरे यांच्या नावावरून ठेवले होते. अर्जेंटिनाने १९२७ पासून दक्षिण जॉर्जियावर दावा केला आहे. ते बेटाला "सॅन पेड्रो" म्हणतात. त्यांचा दावा दक्षिण अमेरिकेतील काही शेजारील देशांनीच मान्य केला आहे.

थे फक्त समुद्रामार्गे जाता येते. या बेटावर कायमस्वरूपी मानवी लोकसंख्या नाही. त्याऐवजी दोन सरकारी अधिकारी आणि ब्रिटनच्या ध्रुवीय संशोधन संस्था आहेत. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणातील सुमारे दोन डझन लोक तिथे असू शकतात. सेंट हेलेनाप्रमाणे दक्षिण जॉर्जिया आता पर्यटकांच्या परत येण्याची वाट पाहत आहे. अंटार्क्टिकाच्या किनारपट्टीवरन जाणाऱ्या क्रूझ जहाजांनी इथे भेट देता येते. २०१९-२० च्या उन्हाळ्यात १२,५६८ पर्यटक इथे भेट द्यायला आले होते. परंतु २०२०-२१ मध्ये हे फक्त दोन सरकारी अधिकारीच इथे होते. १९८२ पासून इथे कायमस्वरुपी मानवी वसाहतच नाही. परंतु पूर्ण दिवस इथे फिरता येते व निसर्गाचा आनंद घेता येतो. युकेत थंडी असते तेव्हा इथे उबदार वातावरण असते. त्यामुळे पर्यटक इथे येणे पसंत करतात.पृथ्वीवरील सर्वात कमी भेट दिलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. दक्षिण जॉर्जिया बेट हे पेंग्विन आणि समुद्री पक्षी प्रजननाचे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. या बेटाच्या आसपासच्या वसाहतींमध्ये लाखो पेंग्विन आढळतात. किंग आणि जेंटू पेंग्विन सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आहेत. बेटावर लाखो इतर महत्त्वाचे समुद्री पक्षी देखील राहतात, ज्यात अल्बाट्रॉस, स्कुआ, पेट्रेल्स, टर्न आणि गुल यांचा समावेश आहे.

दक्षिण जॉर्जियामध्ये थंडीच्या तापमानामध्ये पर्यटकांना बर्फाच्छादित पर्वत आकर्षित करतात, तर याउलट सेंट हेलेनामध्ये ३४ डिग्री सेल्सियस इतके उच्च तापमान असते. ही बेटे पुन्हा उघडल्याने पर्यटकही उत्सुक आहेत.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required