computer

छोटा भीम, छुटकी आणि इंदुमती.. लोक या कार्टूनवर नक्की का चिडले आहेत?

लहानग्यांना वेड लावणारा छोटा भीम सध्या मोठ्यांच्यासुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. झालंय असं की सोशल मीडियावर भीम राजकुमारी इंदुमती सोबत लग्न करणार असल्याची बातमी वायरल झाली आणि नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. लोकांचे म्हणणे होते की भीमने छुटकीसोबत लग्न करायला हवे होते. काही म्हणत होते की शेवटी भीमनेसुद्धा आपल्या लहानणीच्या मैत्रिणीऐवजी राजकन्येला निवडले. तर काहींनी छुटकीला भीमने दगा दिलाय असंही म्हटलंय.

याला उत्तर म्हणून ट्विटरवर #justiceforchutki हा हॅशटॅग ट्रेंड झाला. पण आता ही बातमी फेक असल्याचे छोटा भीमच्या निर्मात्यांनी म्हटले आहे

छोटा भीम या कार्टून सिरीयलचे निर्माते ग्रीन गोल्ड ऍनिमेशन यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले होते, सगळ्यांनी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की छोटा भीममधील पात्रे ही लहान मुले आहेत. त्यात भीम, छुटकी आणि इंदुमती यांचासुद्धा समावेश आहे. सध्या जी बातमी वायरल झाली आहे ती खोटी आहे. आम्ही सर्वाना विनंती करतो की अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये." आणि अशा प्रकारे या वादावर पडदा पडला आहे. निर्मात्यांनी या सिरीयलवर असलेल्या प्रेमासाठी लोकांचे आभारसुद्धा मानले आहेत.

गेल्या दोन तीन दिवसांपासून या विषयावर मीम्सचा पाऊस पडत होता. एकाने सांगितले की लाडू काही झाडावर लागत नाहीत. जर भीमला छुटकीसोबत लग्न करायचे नसेल तर त्याने तिच्या आईच्या लाडूंचा हिशोब पूर्ण करावा. तसेच काहींनी भीम छुटकीच्या भावनांसोबत खेळत असल्याचासुद्धा आरोप केला होता.

कधीकधी लोक जरा जास्तच सिरीयस होतात असं तुम्हांलाही वाटतं का हो??

सबस्क्राईब करा

* indicates required