मनमोहन सिंग यांच्या बायोपिक मध्ये सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचा रोल कोण साकारणार ?

मंडळी गेल्यावर्षी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित याच नावाचा सिनेमा येत आहे. मनमोहन सिंग यांच्या रोल मध्ये अनुपम खेर असणार हे तर आधीच उघड होतं. पण बाकीच्या रोल बद्दल गुप्तता बाळगण्यात आली होती. आता मात्र त्यातील काही भूमिकांबद्दल माहिती मिळत आहे.

मंडळी, नुकतंच अनुपम खेर यांनी 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या सेटवरचा एक फोटो ट्विट केला. या फोटो मध्ये ते मनमोहन सिंग यांच्या लुक मध्ये दिसत आहेत. त्यांच्या बाजूला सिनेमात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी साकारणारे कलाकार उभे आहेत. या दोघांमध्ये राहुल गांधी यांच्या भूमिकेत अर्जुन माथुर तर प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत  आहाना कुमरा दिसत आहेत. आहाना कुमरा लिपस्टिक अंडर माय बुरखा मध्ये दिसली होती.

आणखी एक महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे सोनिया गांधी यांची. या महत्वपूर्ण भूमिकेत सुजॅन बर्नर्ट दिसणार आहे. सुजॅनचं आणि मराठीचं अनोखं नातं आहे. तिने मकरंद अनासपुरे यांच्या ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील लावणी गाजली होती.

स्रोत

मंडळी, या तिघांच्या लुक पेक्षा अनुपम खेर यांच्या लुक मुळे उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अनुपम खेर म्हणजे हुबेहूब मनमोहन सिंग दिसत आहेत. त्यांचे काही फोटो बघून तुम्हालाही ते पटेल.

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required