computer

१६ वर्षांच्या मुलीने गायनात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केलंय.. नक्की कोणता विक्रम आहे हा?

नुसतं कौशल्य असून भागत नाही. आजकाल सगळ्यांना काही ना काही वेगळं करायचं असतं, रेकॉर्ड्स करायचे असतात. केरळच्या एका १६ वर्षांच्या मुलीनेही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. एवढ्या कमी वयात तिचे नाव पूर्ण जगभर पोहोचले आहे. तिची कामगिरी पण तितकीच दखल घेण्याजोगी आहे. १२० भाषांमधील १२० गाणी सलग ७ तास २० मिनिटे म्हणण्याचा विक्रम तिने केला आहे.

सुचेता सतीश असे या विक्रम केलेल्या मुलीचे नाव आहे. दुबई येथे १९ ऑगस्ट येथे 'म्युझिक बियाँड बॉर्डर्स' हा शो झाला. यापूर्वी एका भारतीयाने हा विक्रम केला होता. केसीराजु श्रीनिवास यांनी २००८ साली ७६ भाषांमध्ये गाणी गायली होती. सुचेताने केसीराजूंचा विक्रम मोडला आहे.

त्याठिकाणी त्यांनी २९ भाषांमध्ये आणि इतर देशांतील ९१ भाषांमध्ये गाणी गायली. सुचेता यांनी सांगितले की, 'दुबईत राहत असल्यामुळे आपल्याला इथल्या मिश्र संस्कृतीमुळे विविधता भाषांमधील गाणी गाता आली.'

सुचेता यांना वयाच्या ३ ऱ्या वर्षीच त्यांच्या आई वडिलांनी गाणे शिकवण्यास सुरुवात केली होती. सध्या त्या प्रसिद्ध गायिका आशा मेनन यांच्याकडून कर्नाटकी संगीत शिकत आहेत तर सुजाता हरीश कुमार आणि जयाप्रसाद यांच्याकडून हिंदुस्थानी संगीताचे प्रशिक्षण घेत आहेत.

एका भारतीय गायिकेने दुबईसारख्या ठिकाणी जगभरातील गाणी गावून विक्रम करणे ही भारतीयांना अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे..

सबस्क्राईब करा

* indicates required