computer

शनिवार स्पेशल : २०१७ मध्ये गाजलेले १० भारतीय युट्युब व्हिडीओ!!

२०१७ आता संपत आलेला आहे. हीच वेळ आहे जेव्हा गेल्या वर्षभरात काय काय झालं याचा लेखाजोखा आपण घेऊ शकतो. तर, आता २०१७ च्या गोष्टी थोड्या ‘रिवाइंड’ करूयात. मंडळी, रिवाइंडवरून आठवलं, युट्युबने ‘युट्युब रिवाइंड’ नावाने एक व्हिडीओ सिरीज सुरु केली आहे. यामधून युट्युबने २०१७ चे टॉप व्हिडीओज समोर आणले आहेत. मंडळी, त्यात त्यांनी भारतीय व्हिडीओजचा देखील एक सेक्शन केलाय ज्यात आपल्याला भारतात गाजलेले टॉप व्हिडीओ बघायला मिळतायत!!

राव, सध्या युट्युबची चालती आहे. त्यामुळे ‘युट्युबवरील व्हायरल व्हिडीओला उधाण आलंय. पण या लाखो व्हिडीओजमधून  टॉप १० मध्ये जागा मिळवणारे  फक्त काहीच दर्जेदार व्हिडीओज आहेत. चला, तर आज बघूयात हे १० भारतीय टॉप व्हिडीओज आहेत तरी कोणते?

 

 

१०. झाकीर खान - लाइफमें चाहिए इज्जत!

युट्युब सेलिब्रिटी 'स्टँड अप कॉमेडीयन' 'झाकीर खान' चा हा मस्त व्हिडीओ लोकांना आवडला नसता तरच नवल!!

९. मेहंदी डिझाइन

लग्नसराई, साखरपुडा सारख्या कार्यक्रमात महिलांमध्ये प्रसिद्ध असलेली गोष्ट म्हणजे मेहंदी...या व्हिडीओत दाखवलेली मेहंदी काढण्याची पद्धत अफलातून आहे!!

८. 'तू चीझ बड़ी हें मस्त मस्त' - डान्स व्हिडिओ

'तू चीझ बड़ी हें मस्त मस्त' या हिट गाण्यावर तयार केलेला हा डान्स व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला. तुम्हालाही नक्कीच आवडेल!!

७. आप की अदालत - कंगना राणावत

कंगनाच्या या इंटरव्ह्यूने मोठा वाद निर्माण झाला होता. याच वादाचा असाही फायदा झाला की 'आप की अदालत' युट्युबच्या टॉप १० मध्ये सामील झालं.

६. युनिक रंगोली डिझाईन

चाळणीने रांगोळी काढण्याची अनोखी पद्धत अनेकांना पसंत पडली आणि म्हणूनच तिने या लिस्टमध्ये सहावं स्थान मिळवलं.

५. डम्ब फ्रेंड इन एव्हरी ग्रुप

युट्युबच्या लिस्टमधला आणखी एक कॉमेडी व्हिडीओ.

४. चाचा के पटाके

उत्तर भारतातील भाषा, हलके फुलके विषय आणि उत्तम विनोद पेरणी असा हा मामला जमून आला आहे. 'मेकिंग जोक ऑफ' असं या चॅनेल चं नाव. २०१७ मध्ये तयार झालं आणि एका वर्षातच युट्युबच्या टॉप १० मध्ये जागाही मिळवली...मानलं राव!!

३. शेप ऑफ़ यू

या गाण्याबद्दल काय बोलणार...ऐकल्याबरोबरच प्रत्येकाचेच पाय थिरकायला लागतात!!

२. जिम्मकी कम्मल

'इंडिअन स्कूल ऑफ कॉमर्स' च्या विद्यार्थ्यांनी केलेला हा डान्स प्रचंड व्हायरल झाला आणि चक्क युट्युबचा दुसऱ्या क्रमांकाचा ट्रेंडिंग व्हिडीओ बनला आहे!! गाणं आणि डान्स मस्त जमून आला आहे...

१. ग्रुप स्टडी - भुवन बाम

BB Ki Vines नावाने प्रसिद्ध असलेल्या 'भुवन बाम'ने ना  केवळ भारतातल्या टॉप १० मध्ये जागा मिळवली आहे,  पण जगभरातल्या युट्युब व्हिडीओजमध्ये सुद्धा तो आघाडीवर आहे. खऱ्या अर्थाने युट्युब सेलिब्रिटी !!

 

 

यातला कोणता व्हिडीओ तुम्हाला आवडला, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required