झहीर खानने उरकला साखरपुडा : पहा कोण आहे ही मराठी मुलगी

टिम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खानची एन्गेजमेंट झालीये मंडळी. कोणासोबत काय ? सागरिका घाटगे सोबत !! आता ही सागरिका घाटगे कोण असा प्रश्न विचारू नका. 'चक दे इंडिया' मध्ये भाव खाऊन गेलेली हीच ती मराठी गर्ल. फोटो बघा म्हणजे लक्षात येईल.

युवराज सिंह आणि हेझल कीच यांच्या लग्नात झहीर आणि सागरिकाची जोडी पहिलांदा एकत्र दिसली होती. त्याचवेळी या दोघांच्या अफेअरची चर्चाही रंगली होती. पण दोघांकडूनही या नात्याबद्दल उघड प्रतिक्रिया मिळाली नव्हती. मात्र सोमवारी रात्री खुद्द झहीरनेच दोघांचा फोटो ट्विट करून एन्गेजमेंटची ही वार्ता वायरल करून टाकली.

झहीर आणि सागरिका, तुमच्या आयुष्यातल्या या नव्या इनिंगला बोभाटा कडून गोडगुलाबी शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required