computer

एका तासात २०६ मुतखडे काढले!! मुतखडे होणे टळण्यासाठी आपण काय करु शकतो?

मुतखड्याचा ज्यांना त्रास झाला आहे त्यांना हा आजार किती त्रासदायक असतो याची जाणीव असते. एखाद्या दिवशी असह्य त्रास होऊ नकोसे वाटते. एक मुतखडा देखील माणसाला अतिशय त्रास देऊ शकतो. त्यात त्याचा आकार थोडा जास्त असला म्हणजे अधिकचा त्रास. तेलंगणा येथे मात्र एक अजब किस्सा घडला आहे. एका व्यक्तीच्या शरीरात एक दोन नव्हे तर तब्बल २०६ खडे होते.

नालगोंडा जिल्ह्यातील ५६ वर्षीय विरामल्ला रमललक्षमैय्या यांची ही कहाणी. जवळपास सहा महिने त्यांना असह्य असा त्रास होत होता. त्यात उन्हाळ्यामुळे अधिकच भर पडली. जेव्हा ते डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांना विरामल्ला यांच्या शरीरात एकापेक्षा अधिक खडे असल्याचे समजले. टेस्ट केल्यावर त्यावर शिक्कामोर्तबच झाले.

विरामल्ला यांची मग समज घालण्यात आली आणि त्यांना ऑपरेशनसाठी तयार केले गेले. पण खडे काही एक दोन नव्हते. धोका मोठा होता, डॉक्टरांनी आपली संपूर्ण टीम तयार केली. हैदराबादच्या ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ. पुला नवीन कुमार यांनी डॉ. वेणू मान्ने, डॉ. मोहन यांना सोबत घेतले.

विरामल्ला यांनी ऑपरेशनला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या शरीरातून सर्व खडे काढण्यात डॉक्टर यशस्वी ठरले. मोठ्या आपत्तीतून ते सहीसलामत सुटले. दुसऱ्याच दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. एक खड्याचा त्रास ज्यांनी सहन केला आहे, त्यांना विरामल्ला यांचा २०६ खड्यांचा त्रास समजू शकतो.

डॉक्टर नविन कुमार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करायला हवे. इतकी कठीण सर्जरी त्यांनी अवघ्या तासाभरात पार पाडली. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशावेळी पाणी कमी पिणे हे अशाही पद्धतीने त्रासदायक ठरु शकते. शरीरात डीहायड्रेशन होणे, हे खडे तयार होण्यामागील मुख्य कारण असते.

महिला किंवा पुरुष दोघांना मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. अतिशय कमी आकारापासून तर गोल्फ बॉलच्या आकाराइतका तो वाढू शकतो. जसजसे वय वाढते तसतसा याचा धोका वाढत जातो. त्यातही आधी त्रास असेल तर तो परत होण्याची शक्यता असते.

पाठीमागून पोटाकडे होत जाणारे दुखणे हे मुतखड्याचे लक्षण असू शकते. लघवीला परत परत जावे लागणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी करताना रक्त येणे, मळमळ, उलटी असे त्रास होणे हे देखील मुतखड्याचे लक्षण असतात. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीतजास्त पाणी पिणे, तसेच वरीलप्रमाणे लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडून चेक करून घेणे कधीही उत्तम.

दिवसभर जास्तीतजास्त प्रमाणात पाणी किंवा ज्यूस, सरबत शरीरात कसे जाईल याची काळजी या दिवसांत घ्यायला हवी. त्यामुळे भविष्यात होऊ शकणारा मोठा त्रास वाचतो.

सबस्क्राईब करा

* indicates required