या नव्या माहितीनंतर तुम्ही कधीच बाटलीबंद पाणी पिणार नाही...

हॉटेलात गेल्यावर वेटर विचारतो पाणी साधं का बाटलीबंद? (म्हणजे आपलं बिस्लेरी)!  आपण पण तोऱ्यात सांगतो, "बिस्लेरी दे" म्हणून. एक लिटर पाण्याला 20 रुपये मोजून आपल्याला वाटतं आपण सेफ्टी विकत घेतली आहे. पण आज एक माहिती समोर आली आहे ज्यानुसार मिनरल वॉटर म्हणून आपण जे काही पितो त्यामध्ये प्लास्टिकचे अंश सापडले आहेत. बिस्लेरी, किनले, aquafina आणि इतर सगळ्या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये हे मायक्रो प्लास्टिक कण सापडले आहेत. आश्चर्य म्हणजे साध्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाण्यात हे प्रमाण दुप्पट आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करणाऱ्या शेरी मेसन यांनी जगभरातल्या बाटलीबंद पाण्याचा अभ्यास केला. त्यांना ९३% सॅम्पलमध्ये प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. पाण्यामध्ये नायलॉन, पॉलिथीन, पोलीप्रोपेनचे कण आढळून आले आहेत.  हे सगळे घटक मुख्यत्वे बाटलीच्या झाकणातून पाण्यात येतात. पाण्यात असलेल्या या प्लास्टिक कणांमुळे कँसर, शुक्राणू कमी होणे, ऑटिझम असे अनेक रोग होऊ शकतात. या रिसर्चच्या म्हणण्यानुसार साधं पाणी हे बाटलीबंद पाण्यापेक्षा चांगलं आहे.

तर काय मग, तुम्ही आता कोणतं पाणी पिणार आहात??