जुदा हो के भी, तू मुझ में कई सारा बाकी है !!!

काय म्हणता? दिवसाची सुरुवात या विषयाने नको? सकाळी तर नकोच?

अहो, पण हा विषयच सकाळचा आहे. तो सकाळीच सरसकट आणि तात्काळ आटपायला हवा नाहीतर ...

नाहीतर चीनमधल्या त्या तरुणासारखी वेळ तुमच्यावर आली तर फारच पंचाईत व्हायची !!! 

काय झालं ते आता सविस्तर वाचा.. आणि  नंतर हवं तर ओह! शिट्ट!! असं म्हणा.

चीन मधला हा तरुण जेव्हा हॉस्पीटलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याचं पोट अगदी  नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवतीसारखं दिसत होतं. अगदी कोणत्याही क्षणी आतडं फुटेल अशी अवस्था होती. कारण त्या तरुणाला लहानपणापासून बध्दकोष्ठाची सवय होती (Hirschsprung) आणि त्याच्या पालकांनी बध्दकोष्ठ ही एक मामुली, दुर्लक्ष करण्यायोग्य अवस्था आहे असं गृहीत धरलं होतं.

या तरुणावर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या आतड्याचा तीस इंचाचा तुकडा कापून काढण्यात आला. या आतड्याच्या तुकड्यात चक्क १३ किलो  मल साठला होता!! यक्क!! जर ही शस्त्रक्रिया केली नसती तर  त्याच्या शरीरात सेप्टीक होऊन प्राणावर बेतण्याची शक्यता होती.

स्रोत

वर्षानुवर्षं हा तरुण पोट साफ होण्यासाठी- सुपडा साफ होण्यासाठी -अनेक औषधं घेत होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. 

ग्रेट ब्रिटन ही बध्दकोष्ठाची राजधानी समजली जात असली तरी हा त्रास जगात ५० टक्क्याहून अधिक लोकांना कमीजास्त प्रमाणात होत असतो आणि एक क्षुल्लक बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.!

तेव्हा मित्रांनो, निसर्गाच्या हाकेकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर आरोग्याचा  सुपडा साफ व्हायला फार वेळ लागणार नाही !!!

सबस्क्राईब करा

* indicates required