computer

मेंदू खाणाऱ्या अमिबाची चर्चा का होत आहे? तो कसा पसरतो, किती घातक आहे?

एखादा हॉलीवूडचा चित्रपट पाहिलाय का हो? ज्यामध्ये एखादया शहरावर एक अजस्त्र,अमानवी प्राण्याचा शहरवासीयांवर हल्ला होतो. पहिल्या हल्ल्यात तो पूर्ण शहराचे नुकसान करतो, अनेकांचे जीव घेतो. मग पुढचा हल्ला करण्यापूर्वी पूर्ण यंत्रणा त्याच्याशी युद्ध करायला तयार होते. पुढच्या हल्ल्यात संरक्षण यंत्रणा त्याला नेस्तनाबूत करून सुटकेचा निश्वास टाकते पण तोवर त्याच्यापेक्षा अजून मोठा प्राणी तयार होतो आणि पुढचा हल्ला करतो.

अगदी असंच काहीसं झालंय, पण चित्रपटात नाही. नुकतंच संशोधकांनी कोरोनावर लस तयार केली आहे. त्याचे लसीकरण सर्वत्र सुरू होईलच. पण संशोधकांपुढे अजून एक नवे आव्हान उभे राहिले आहे. ब्रिटनमध्ये नुकत्याच आलेला कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल तर आपण वाचलेच असेल. त्यावर संशोधन चालूच आहे. पण अजूनही संकटाची मालिका संपताना दिसत नाहीये. एका मेंदू पोखरणाऱ्या अमिबाने अमेरिकेत हाहाकार माजवलाय..

काय प्रकरण आहे हे? समजून घेऊया...

मेंदू पोखरणारा अमिबा म्हणजे नक्की काय?

या अमिबाचे नाव आहे नेग्लेरिया फाओलेरी (Naegleria fowleri) आहे आणि या अमिबाने होणाऱ्या आजाराला इसेशियल अमीबिक मेनिनजोएनसेफालिटिल (PAM) असे म्हणले जाते. सेंटर फॉर द डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार अमेरिकेत याचे बरेच रुग्ण आढळत आहेत. मुख्यतः पश्चिमेला याचं संक्रमण जोरदार होत आहे. 

सीडीसीनुसार मेंदू पोखरून टाकणाऱ्या अमिबाचे संक्रमण पाण्यातून होते. पिण्याच्या पाण्यातून अमीबा असलेले पाणी जर नाकातून शरीरात गेले तर अमिबा  nasal membranes च्या माध्यमातून मेंदूमध्ये शिरतो. यामुळे ताप, चक्कर येणे, अतिप्रमाणात थकवा, उलटी, स्मृतिभंश असा त्रास सुरू होतो. संक्रमणानंतर बारा दिवसांत रुग्ण मरण पावतो. यावर सध्या तरी काही औषध नाही.

अमरिकेत सप्टेंबर 20 मध्ये टेक्सास शहरातील एक सहा वर्षांचा मुलगा याचा बळी ठरला आहे. तो मृत झाल्यावर तिथल्या पाण्याची चाचणी करण्यात आली. चाचणीत त्या पाण्यात हा अमिबा आढळला.  २०१० ते २०१९ केवळ ३४ रुग्ण PAM पीडित  सापडले होते. पण यात मृत्युदर 97 टक्के आहे. म्हणूनच हा विषाणू अत्यन्त घातक मानला जातो.

नेग्लेरिया फाओलेरी (Naegleria fowleri) हा अमिबा स्वच्छ पाण्यात आणि मातीत आढळतो. हा नाकाद्वारे शरीरात जातो त्यामुळे अशा पाण्यात पोहणे जीवावर बेतू शकते. यामुळे होणाऱ्या PAM आजारावर अजून तरी काही उपाय सापडलेला नाही. हा आजार संसर्गजन्य नाही हीच एक दिलासादायक. एका व्यक्तिकडून दुसऱ्याला याची लागण होत नाही. हवेतून हा पसरत नाही. तसेच समुद्री पाण्यातूनही याचे संक्रमण झालेय असे आढळले नाही.

सद्यपरिस्थित अमेरिकेत सर्वांना चिंतेत टाकणारी ही बाब आहे. संशोधक, प्रशासन यासाठी उपाययोजना तसेच अभ्यास करतीलच, पण तूर्तास खबरदारी हाच उपाय दिसतोय.

हॉलीवूडच्या चित्रपटात होणाऱ्या हॅपी एंडिंग प्रमाणेच याही संकटावर मात करून सर्व मानवजातीचे रक्षण व्हावे हीच ईच्छा आणि प्रार्थना.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required