पेनाच्या टोपणाला हे लहानसं छिद्र का असतं...काय आहे या मागील कारण ?

मंडळी आम्ही तुम्हाला काही आठवड्यापूर्वी ‘वर्तमानपत्राच्या तळाशी हे चार ठिपके का असतात !!!’ या लेखामधून वर्तमानपत्राच्या तळाशी असलेल्या चार ठिपक्यांमागील लॉजिक काय आहे याबद्दल माहिती दिली होती. मंडळी आज आम्ही असचं एक भन्नाट लॉजिक घेऊन आलो आहोत.

मंडळी आजचा विषय आहे पेनाच्या टोपणावरील लहानसं छिद्र. तुम्ही कधी पेनाच्या टोपणावर असलेलं लहानसं छिद्र बघितलं आहे का ? नक्कीच बघितलं असणार...ते का असतं हे माहित आहे का राव ?...माहित नाही ? मग चला जाणून घेऊ काय आहे यामागे कारण !!


(स्रोत)

तर, कोणाला वाटेल की हे पेनाच्या आत शाई पर्यंत हवा पोहोचवण्यासाठी या छिद्राचा उपयोग होत असावा  पण याचं खरं कारण आहे माणसाचा जीव वाचवण्यासाठी केलेली ‘स्मार्ट’ व्यवस्था. समजा, जर पेनाचं टोपण कोणी चुकून गिळलं तर ते सरळ जाऊन अडकणार श्वसन नलिकेत त्यामुळे गुदमरून जीव जाण्याची वेळ येऊ शकते. अश्या निकडीच्या प्रसंगी श्वास घेता यावा म्हणून पेनाच्या झाकणाला वरच्या बाजूस लहानसं छिद्र पाडलेलं असतं जेणेंकरून श्वास कोंडला जाऊ नये आणि मदत येऊ पर्यंत श्वसन क्रिया सुरु राहावी !!

आता तुम्हाला वाटेल की पेनाचं टोपण कोणी कसं काय गिळेल किंवा अश्या केसेस खूप कमी असतील. पण दर वर्षी या कारणाने शेकडो लोक जीव गमावतात पण या छिद्रामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत !!!

आहे की नाही लॉजीकल ?