computer

लस मिळत नाहीय्ये ? लसीसाठी अपॉइंटमेंट मिळवण्याचे हे ४ मार्ग वापरून बघा !

कोरोनाची दुसरी लाट चालू आहे, तिसरी येणार अशी चर्चा चालू आहे, त्यातच ती लाल-काळी-निळी बुरशी डोकं वर काढतेय. लस घेणं आणि ती ही लवकरात लवकर घेणं हाच आजच्या घडीला सगळ्यांच्या डोक्यातला विचार आहे. पण्....Cowin वर स्लॉट मिळत नाही आहेत!! एका सेकंदात सगळे स्लॉट गायब होत आहेत. १००० असोत वा ५००, नोटिफिकेशन येऊन सर्च करेपर्यंत सगळेच स्लॉट्स बूक होत आहेत. रोज Cowinवर जाऊन प्रयत्न करुन वैतागला असाल तर  यावर आमच्याकडे काही उपाय आहेत. म्हणजे उपायांचे स्रोत आहेत. यातले काही उपाय बोभाटा टीमने वापरून बघितले आहेत,  काही उपाय हे आमच्यापर्यंत पोहचले आहेत. 

या उपायांकडे वळण्यापूर्वी आपण एकदा कोविनमध्ये नोंदणी करताना काय टप्पे आहेत ते बघूया. 

टप्पा एक:  कोविनवर तुमची माहिती भरण्यासाठी मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवणे.  तुमचे नशीब आणि फोनचे नेटवर्क चांगले असेल तर तुम्ही टप्पा दोनकडे जाल. 

टप्पा दोन:  तुमचे नाव, आधार कार्ड टाकून नोंदणी करणे. 

टप्पा तीन:  तुमच्या शहराचे/ जिल्ह्याचे नाव/ पिनकोड टाकून कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती स्लॉट आहेत त्याची माहिती मिळवणे. नशिबाने तुम्हाला जर हिरव्या रंगात स्लॉट दिसले तर पुढचा टप्पा. 

टप्पा क्रमांक चार: कॅप्चा टाकून स्लॉट मिळवणे. जर तुम्ही क्षणार्धात हे करू शकलात तर तुम्हाला बुकिंग मिळेल. पण सध्या इथेच घोडे पेंड खाते आहे. म्हणूनच हा टप्पा सोपा करण्यासाठी काही टिप्स देत आहोत. 
 

तर आपण एक एक टप्प्यासाठी असलेल्या सोयी पाहूया. 

कोविनवर रजिस्टर करून ठेवा. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. ज्या मोबाईल क्रमांकावर नेटवर्क चांगले येते आणि मेसेज पटापट येतात त्या नंबरने रजिस्टर करा. आपल्या शहरात कधी स्लॉट उघडतात ते बघण्यासाठी म्हणजेच दुसऱ्या टप्प्यासाठी पुढचा उपाय आहे.

१. टेलिग्राम ग्रुप्स किंवा Paytm.

१. टेलिग्राम ग्रुप्स किंवा Paytm.

प्रत्येक शहराचे अलर्ट देणारे telegram ग्रुप्स आहेत. आपल्या शहराचा ग्रुप शोधून ठेवा. आपल्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये स्लॉट आले की नोटिफिकेशन येते. Paytm मध्ये सुध्दा ही सोय आहे. एखादा-दोन दिवस बघत राहिले तर साधारण कधी स्लॉट्स येतात याचा अंदाज कळतो. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार खालील वेळेत स्लॉट उघडतात.

मुंबई:  संध्याकाळी ४ ते ७ मध्ये. 

नवी मुंबई: मुख्यत: संध्याकाळी ५ नंतर.  अपोलो हॉस्पिटल सोमवार आणि गुरुवार संध्याकाळी ५ वाजता किंवा त्यानंतर.  या अपोलोची वाशी, नेरूळ आणि खारघर येथे सेंटर्स आहेत. 

पुणे: पुण्यातल्या हॉस्पिटल्सचे स्लॉट्स् वेगवेगळ्या वेळेत जाहिर होतात. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये रोज १००० च्या आसपास स्लॉट उघडतात. 

औरंगाबाद: एम. जी. एम.चे स्लॉट संध्याकाळी ७-७:३० मध्ये उघडतात. 

अर्थात ही माहिती बोभाटा आपल्या अनुभवावरून देत आहे. त्यामुळे आपण स्वतः वर उल्लेखलेल्या ग्रुपचा भाग होऊन माहिती मिळवावी. 

जर हे सगळे करून तुम्हाला वेळेत माहिती मिळाली आणि हिरव्या रंगात स्लॉट दिसले तर पुढचे आसमानी संकट म्हणजे कॅपचा.  कॅप्चा टाळण्यासाठी पुढचा उपाय कामी येतो.

२. उमंग ॲप

उमंग हे सरकारी ॲप डाऊनलोड करा. त्यात कोविनवर वापरलेल्या नंबरने लॉगिन करा. आपल्या भागातले हॉस्पिटल शोधा आणि हिरवा रंग म्हणजेच उपलब्ध स्लॉट्स् दिसल्या दिसल्या पुढे जा. तुम्ही कॅप्चा टाकायला तयार असाल, पण उमंगमध्ये हे टाकावेच लागत नाही. थेट बुकिंग होते. 

तर हे होते सरळमार्गी उपाय. पण आता असेही काही उपाय आहेत जे बरेच लोक सध्या वापरत आहेत. हे उपाय योग्य की अयोग्य या चर्चेत आम्ही पडणार नाही. यातले सगळेच उपाय बोभटाने वापरून बघितले नाहीत. त्यामुळे ते आपापल्या जबाबदारीवर पाहावेत. 

३. पहिला बॉट

https://yashwanthm.github.io/cowin-vaccine-booking/

ह्यात महत्त्वाचे म्हणजे हे स्लॉट शोधत बसायचे काम हा बॉट करतो.  आपल्याला फक्त ओटिपी आणि कॅप्चा टाकायचा आहे. स्लॉट आले रे आले की या बॉटमधून आवाज येतो आणि तो ओरडून कॅप्चा टाकायला सांगतो. म्हणजे यात तुम्हाला बुकिंग मिळण्याची शक्यता जास्त आहे.  फक्त या बॉटची स्क्रीन मिनिमाईझ करायची नाही.  बोभाटा टीमने हा बॉट स्वतः वापरून बघितला आहे. 

४. दुसरा बॉट

https://chrome.google.com/webstore/detail/cowin-bot/ipdhilmkmmbfeilncgchfdabkpnhbeog?hl=en

या मध्ये तुम्हाला क्रोम प्लगइन मिळेल. यात तर तुम्हांला कॅप्चा टाकायचीही गरज नाही. या स्क्रीप्ट्स तुम्ही एकदा माहिती दिली की आपोआप स्लॉट्स शोधतो, कॅप्चा वाचून कोविनमध्ये टाकतो आणि तुम्हांला थेट लसीकरणाच्या बुकिंगचा संदेश येतो. 

तर वाचकहो, १००० स्लॉट्स निमिषार्धात कसे गायब होतात ते आता कळालेच असेल. पाहा, सरळ सरकारी मार्ग वापरा किंवा बॉट्सचा आधार घ्या, काही करा पण लवकरात लवकर लस घ्या आणि सुरक्षित व्हा. कसे?

सबस्क्राईब करा

* indicates required