computer

दंडबैठका मारा आणि तिकीट मोफत मिळवा...रेल्वे विभागाने शोधलेली नवीन स्कीम पाहिली का?

भारतीय रेल्वेने ‘फिट इंडिया’ मोहीम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. सध्या दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर एक मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनवर उभं राहून ३० दंडबैठका घातल्या की तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळतं. हा व्हिडीओ पाहा.

३० दंडबैठका घातल्यावर या मशीनमधून तिकीट बाहेर पडतं. उद्देश एवढाच की लोकांना व्यायामाचं महत्त्व समजावं. ही हटके कल्पना सध्या व्हायरल झाली आहे.

फिट इंडिया सोबत ‘दवा दोस्त’ नावाचा आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाशांना कमीत कामी दारात औषधं उपलब्ध करून दिली जातील. या उपक्रमात जेनेरिक मेडिसिन्सवर भर देण्यात आला आहे. सध्या दवा दोस्तच्या १० शाखा राजस्थानमध्ये तर १० शाखा दिल्लीमध्ये आहेत येणाऱ्या काळात १० चे १०० आणि ४ वर्षात १००० करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

याखेरीज नाडी मोजण्याची मशीन बसवण्यात आली आहे. शरीर रचना विश्लेषण, रक्तदाब, वेगवेगळे रोग याबद्दल मशीनद्वारे माहिती मिळू शकते. प्रवाशांचा थकवा घालवण्यासाठी एक अत्याधुनिक मसाज मशीनही आहे. ही मशीन 3D पद्धतीने मसाज करते. 

तर मंडळी, हे उपक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात यावेत असं तुम्हाला वाटतं का?

सबस्क्राईब करा

* indicates required