वैद्य अश्विन सावंत सांगत आहेत, 'बदाम आरोग्यासाठी कितपत उपयुक्त आहेत ?'

मंडळी, "स्मरणशक्ती चांगली ठेवायची असेल तर बदाम खा", असं म्हटलं जातं. टीव्ही वरील जाहिरातीतून विशिष्ट बदामाची जाहिरात केली जाते. 'बदाम आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहेत,' याचा हल्ली बराच गाजावाजा झालेला दिसतोय. पण खरंच बदाम आपल्या आरोग्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहेत का ? जे पोषण बदामांमधून मिळते, ते इतर पदार्थांमधुन मिळणार नाही का ? याबद्दल आपल्याला सांगत आहेत वैद्य अश्विन सावंत.

चला तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया बदाम आरोग्यासाठी कितपत उपयुक्त आहे ते.

स्रोत

"अनेक वर्षे बदामाचा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, ‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’ असे काय पोषण या बदामांतून मिळते- जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही? बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या तीळांमधून त्याहून अधिक म्हणजे ९.३ मि. ग्रॅ. आणि अहळीवांमधून तर तब्बल १०० मि. ग्रॅ. लोह मिळते. 

बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले (EFA) कलिंगडाच्या बियांमधूनही मिळतात. तीळांतून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ. आणि तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ.! हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.! महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत !
(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)

 

लेखक : वैद्य अश्विन सावंत

मोबाईल क्र. : 9920748444

इमेल आयडी : [email protected]

 

सबस्क्राईब करा

* indicates required