computer

कोरोनाशी झुंज देताना व्हेंटिलेटर महत्त्वाचं का आहे? व्हेंटिलेटर नेमकं काय काम करतं?

गंभीर स्थितीतील रुग्णांना व्हेंटिलेटरवर हलवलं जातं. सध्या COVID-19 आजारामुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही व्हेंटिलेटर अत्यावश्यक ठरत आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ ८० टक्के रुग्ण व्हेंटिलेटर शिवाय बरे होत आहेत. ही चांगली बातमी असली तरी राहिलेल्या त्या २० टक्के लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 तुम्ही कधी विचार केला आहे का व्हेंटिलेटर नेमकं काय काम करतं? चला तर या निमित्ताने व्हेंटिलेटरचं काम चालतं ते समजून घेऊया.

व्हेंटिलेटर काय काम करतं?

व्हेंटिलेटर तुमचा श्वासोच्छवास सुरळीत करण्याचं काम करतं. बरेचदा विषाणूमुळे फुफ्फुसाला इजा पोहोचून रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीकडून शरीरातील रक्तवाहिन्यांचं प्रसरण केलं जातं आणि जास्तीजास्त रोगप्रतिकारक पेशी पाठवल्या जातात. याचा दुष्परिणाम असा की यामुळे फुफ्फुसांत स्त्राव जमा होतो. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं.
अशावेळी व्हेंटिलेटरमधून रुग्णाला हवेचा पुरवठा केला जातो. या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. व्हेंटिलेटरचं काम इथेच थांबत नाही. रुग्णाला पुरवल्या जाणाऱ्या हवेत उष्णतेचं प्रमाण आणि हवेतील आर्द्रता रुग्णाच्या शरीराशी जुळेल अशी ठेवली जाते. यासाठी डॉक्टर रुग्णाला श्वसन स्नायूंना सैल होण्यासाठीची औषधं देतात.

काही केसेसमध्ये रुग्णाला नैसर्गिकपणे श्वास घेता येत नाही. तेव्हा व्हेंटिलेटर हा एकमेव पर्याय ठरतो. अशा केसेसमध्ये जर व्हेंटिलेटरच्या तांत्रिक बाबी नीट माहित नसतील तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 

तर मंडळी, आजच्या जागतिक महामारीच्या वेळी जगाला व्हेंटिलेटरची सर्वाधिक कमतरता भासत आहे. भारतापुरतं बोलायचं झालं तर केवळ ३०,००० ते ५०,००० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्याची परिस्थिती बघता भारताला एकूण १० लाख व्हेंटिलेटर्सची गरज आहे. एक चांगली बातमी म्हणजे व्हेंटिलेटर्स तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. काही आठवड्यांतच ही कमतरता भरून काढण्यात येईल अशी आपण आशा करू.

सबस्क्राईब करा

* indicates required