computer

कोरोनाला नष्ट करणारा चमत्कारी मास्क! इस्त्रायली कंपनीची यशस्वी निर्मिती...

एकीकडे कोरोना वायरसचा हाहाकार दिवसागणिक वाढत चाललाय, तर दुसरीकडे जगभरातले डॉक्टर्स, वैज्ञानिक, औषध निर्मात्या कंपन्या त्यावरची लस आणि औषध शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत. सध्या अनेक लसींच्या चाचण्या निर्णायक टप्प्यातही आहेत. मात्र त्या प्रत्यक्ष सामान्यांसाठी उपलब्ध व्हायला बराच वेळ लागेल. तुर्तास लोकांनी SMS -म्हणजेच सॅनिटायझींग, मास्क, आणि सोशल डिस्टन्सिंग- ही त्रिसूत्री अवलंबून कोरोनापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

अशात इस्त्रायलच्या 'सोनोविया' या मास्क बनवणाऱ्या कंपनीनं एक असं कापड बनवण्याच्या दावा केलाय जे ९९% कोरोना विषाणू नष्ट करू शकतं. प्रयोगशाळेत केलेल्या परिक्षणानुसार अनेकदा धुतल्यानंतरही हा मास्क तितकाच सक्षम ठरतो.

या कंपनीचं म्हणणं आहे की हा मास्क झिन्क ऑक्साईड कोटेड सुक्ष्म कणांनी बनवला गेलाय. त्यामुळे तो सुक्ष्मजंतू, बुरशी आणि विषाणूंना नष्ट करून टाकतो आणि साहजिकच त्यायोगे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालता येईल. शांघायमधील मायक्रोस्पेक्ट्रम लॅबमध्ये झालेल्या परिक्षणातून समोर आलंय की या मास्कसाठी वापरलेलं कापड हे ९९ टक्क्याहून जास्त कोरोनाचे विषाणू निष्क्रिय करू शकते. येत्या काही आठवडयांत या कापडाचा वापर हॉस्पिटलमधील कापड आणि पीपीई किट बनवण्यासाठीही होईल असं सोनोविया कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लियाटट गोल्धामर यांनी सांगितलंय.

कोरोना संक्रमणापासून आणि संसर्गापासून वाचण्यासाठी हा मास्क बराच उपयोगी ठरू शकतो. बरोबर ना?

सबस्क्राईब करा

* indicates required