computer

नवीन नोरोव्हायरस काय आहे? कसा पसरतो. लक्षणे आणि उपचार समजून घ्या!!

कोरोना संपायचे नाव घेत नसताना कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट लोकांचे टेन्शन वाढवत आहे. त्यातच आता पूर्णपणे नवा असा नोरोव्हायरस युकेत वाढत आहे. मे महिन्यापासून तर आजवर या व्हायरसचे तब्बल १५४ रुग्ण सापडले आहेत.

युके कोरोनापासून हळूहळू मुक्त होत असताना त्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली होती. सर्वच प्रकारच्या वयोगटात या व्हायरसचा प्रसार होत आहे. नोरोव्हायरस हा अन्नामुळे होणाऱ्या अर्ध्याहून अधिक आजारांचे कारण ठरत आहे.

हा नोरोव्हायरस पोटाचा फ्ल्यू म्हणून ओळखला जात आहे. सिजनल फ्ल्यू, इन्फ्लुएन्झा व्हायरस, तसेच ज्या व्हायरसमुळे कोरोना होतो अशा कुठल्याही व्हायरसशी निगडित नाही. या व्हायरसला दिले जाणारे दुसरे नाव म्हणजे फूड पॉयजनिंग किंवा पोटजंतू. यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल ती म्हणजे अतिशय संसर्गजन्य असलेला हा व्हायरस पोट आणि अन्नाशी संबंधित आहे.

या व्हायरसने एखाद्याला गाठल्यावर तो १२ ते ४८ तासांत त्याचे गुण दाखवतो. तसेच जवळपास तीन दिवस तो शरीरात टिकून असतो. या रोगाची लक्षणे म्हणजे डायरिया, पोटदुखी, मळमळ, उलटी, डोकेदुखी, अंगदुखी, ताप ही सांगितले जात आहेत.

हा व्हायरसलोकांच्या विष्ठा आणि उलटीमधून सापडला आहे. अगदी कमी प्रमाणातही विष्ठा किंवा उलटी, खराब पाणी किंवा खराब अन्न असेल आणि त्यात हा व्हायरस असेल, तर तो या अन्नपाण्याच्या सानिध्यात आलेल्या लोकांना गाठतो. त्यांचे छोटेसे कण देखील हा रोग होण्यासाठी पुरेसे आहेत.

ज्या जेवणात किंवा पाण्यात नोरोव्हायरस शिरला ते अन्नपाणी ज्याने सेवन केले त्याला हा रोग झालाच म्हणून समजा. तसेच ज्या जागेवर नोरोव्हायरस आहे त्या जागेला हात लावून तो हात पुन्हा तोंडाला लावल्यास नोरोव्हायरस होऊ शकतो. नोरोव्हायरस झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे अन्नपाणी शेअर करणे नोरव्हायरसला आमंत्रण ठरू शकते.

डॉक्टर या आजाराचा उपचार हा लक्षणांचा अभ्यास करून करत आहेत. सध्यातरी या आजारासाठी कुठल्याही गाईडलाईन्स जाहीर झालेल्या नसून तसेच कुठलेही विशिष्ट उपचार यासाठी नाही. काही लोकांना हा आजार होऊन जातो तरी समजत नाही. मात्र वृद्ध, लहान मुले किंवा ज्यांना दुसरा आजार आहे त्यांना ऍडमिट करण्याची वेळ येऊ शकते.

एकदा नोरोव्हायरस होऊन गेल्यावर किती दिवसांनी तो परत होऊ शकतो याबद्दल अजून माहिती आलेली नाही. नोरोव्हायरस हा कोरोनाशी बऱ्यापैकी मिळता जुळता असून पहिलाच व्हायरस संपलेला नसताना दुसरा व्हायरस वाढत असल्याने जगाची चिंता मात्र वाढत आहे.

भारतात हा विषाणू पोचल्याची खात्रीलायक बातमी नाही हे दिलासादायक आहे. पण सध्याचे पावसाळ्याचे दिवस आणि अन्नपाण्यातून पसरण्याची या विषाणूची लक्षणे पाहता आपण काळजी घ्यायला हवी हे खरे!!

सबस्क्राईब करा

* indicates required