८ तासांच्या झोपेनंतरही थकवा जाणवतो? मग हे वाचाच!!

दिवसभर भरपूर काम केलं की रात्री कधी एकदा झोपतो असं होतं. रात्रीची अखंड आठ तासाची झोप झाली की सकाळी पुन्हा एकदम फ्रेश!! असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच नेहेमी येतो. काही लोकांना मात्र झोप पुरेशी मिळूनही  सकाळी उत्साह वाटत नाही. गळून गेल्यासारखं वाटतं. दिवसभर पेंग येतो. अंग दुखतं. कंटाळा येतो. कधी कधी मौसमच असा खराब आहे अशीच समजूत करून माणसं स्वस्थ बसून राहतात. पण लक्षात घ्या, थकवा जाणवणे हे सर्वसामान्य लक्षण आहे. पण पूर्ण वेळ झोप मिळूनही थकवा जाणवणे हे आजाराचे लक्षण आहे .

असा थकवा वारंवार जेव्हा जाणवतो तेव्हा त्याची कारणं काय असू शकतात ते आज आपण बघू या !!

स्रोत

थायरॉइड -  आपल्या घशात अन्न आणि श्वासनलिकेच्यावर थायरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी जेव्हा अतिरिक्त प्रमाणात हार्मोनचा स्त्राव करते त्याला  हायपरथॉयराडीजम hyperthyroid असे म्हणतात. जेव्हा स्त्राव कमी होतो तेव्हा त्याला हायपोथायरॉडीजम असे म्हणतात. दोन्ही प्रकारात हार्मोनचे संतुलन बिघडते आणि शरीराच्या चयापचयावर त्याचा परिणाम होऊन थकवा येतो. यासाठी (T3 आणि  T4) सोबत TSH या सबंधित चाचण्या करायच्या असतात.

अ‍ॅनेमीया : प्राणवायू शरीरातल्या प्रत्येक स्नायू आणि पेशींपर्यंत पोहचवणे हे  रक्तातल्या लाल पेशींचे कार्य असते. लाल रक्तपेशीत असलेल्या  हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाले की थकव्याचे प्रमाण वाढते. थकव्यासोबत अंग दुखणे आणि हलकासा दम लागणे अशी पण लक्षणेही  दिसतात. यासाठी रक्तातील हिमोग्लोबीन आणि टोटल ब्लड काउंट या चाचण्या करायच्या असतात.

स्रोत

मधुमेहः सर्वसाधारणपणे चाळीशीच्या नंतर मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात.  थकवा येणे , दिवसा सुस्ती जाणवणे अशा  ही  सर्वसाधारण लक्षणे मधुमेहाची असतील असे लक्षात येत नाही. रक्तातील शर्करेचे (ग्लुकोजचे) प्रमाण मधुमेहामुळे वरखाली होत असते. " टाइप २"  मधुमेहाच्या रोग्यांना ही लक्षणे प्रकर्षाने जाणवतात. चाळिशीच्या दरम्यान संपूर्ण झोप झाल्यावर वारंवार थकवा जाणवल्यास मधुमेहासाठी रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. उपाशीपोटी रक्त शर्करेचे प्रमाण आणि जेवल्यानंतरचे प्रमाण अशा दोन्ही चाचण्या सुरुवातीला करायच्या असतात. 

अशा सर्व चाचण्या सहज करता येत असल्या, तरी या चाचण्यांचे अहवाल आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवून मगच पुढचे उपचार ठरवा. 

फक्त वर लिहिलेल्या कारणांखेरीज इतर अनेक कारणे पण अशा लक्षणांना जबाबदार असतात. मानसिक दबाव, आर्थ्रायटीस, इत्यादी अनेक कारणांनी थकवा जाणवतो. नेमक्या कारणावर बोट ठेवून योग्य उपाय फक्त डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत. 

सबस्क्राईब करा

* indicates required