बोभाटा स्पेशल : जागतिक एड्स दिन !!

१९८८ नंतर १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा होऊ लागला. जागतिक एड्स दिन म्हणजे एच. आय. व्ही. एड्स बद्दल जागरुकता पसरवण्यासाठी पाळला जाणारा दिवस !! मंडळी एड्स सारख्या जीवघेण्या रोगाबद्दल जागरुकता पसरवण्याची मोहीम अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेक संस्था आज काम करत आहेत पण आजही या रोगाबद्दल माणसांमध्ये पूर्ण माहिती पसरलेली नाही.
एड्स हा रोग जीवघेणा यासाठी आहे कारण या रोगाचे जीवाणू थेट आपल्या रोग प्रतिकारकशक्तीवर हल्ला करतात त्यामुळे इतर अनेक आजार होण्याचा संभव असतो. एड्स झालेल्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी) होण्याची शक्यता जास्त असते.

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ सारखी जागतिक संस्था एड्स बद्दल जागरुकता पसरवण्याचं काम करत आहे. २०१६ च्या रिपोर्ट नुसार २०.९ मिलियन माणसांपर्यंत एड्सचा उपचार पोहोचलेला आहे. जवळजवळ २४ लाख केसेस ही एकट्या भारतात आहेत. साउथ आफ्रिका आणि केनिया नंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ही बाब खरच चिंताजनक आहे.

मंडळी, जागतिक एड्स दिनानिमित्त ‘डॉक्टर तुषार जगताप’ काय म्हणतायत ते आपण ऐकुया.

सबस्क्राईब करा

* indicates required