१४ वर्षात या पठ्ठ्यानं एकही दिवस शाळा बुडवली नाही ??

शाळेत असताना काही तरी कारण काढून घरी बसण्यासारखं सुख नसायचं.  कधी पाऊस, तर कधी खोटं पोट दुखणं, गृहपाठ न केलेला असणं अशी एक ना अनेक कारणं आपण लहानपणी वापरली आहेतच. पण आज अशा एका मुलाबद्दल आपण बोलणार आहोत जो तुम्हाआम्हापेक्षा खूप वेगळा आहे. त्यानं म्हणे गेल्या 14 वर्षात शाळाच बुडवली नाहीय. 

भार्गव मोदी या गुजरातमधील पी आर खातीवाला विद्या संकुल शाळेत शिकणारा मुलगा सलग २९०६ दिवस शाळेत हजर राहिलाय. त्याने सिनियर के.जी.पासून ते १२ वी पर्यंत एकदाही शाळा बुडवली नाहीय. त्याच्या या शिस्तशीरपणाची दखल इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे.

ही शिस्त बहुदा यांच्या रक्तातच आहे. भार्गवनं आपला भाऊ वत्सल याचंच रेकॉर्ड मोडलं आहे. वत्सलनं सलग २५३७ दिवस शाळेत हजेरी नोंदवली होती. भार्गवच्या म्हणण्यानुसार रविवारची एक दिवसाची सुट्टी त्याला रिचार्ज व्हायला पुरेशी आहे आणि मुळातच त्याला शाळेला जायला आवडतं. 

मानलं पाहिजे राव या पोराला, आपल्याला नसतं जमलं इतकं सलग शाळा अटेंड करणं...

सबस्क्राईब करा

* indicates required