f
computer

या १० देशांत एक रुपयाची किंमत अनेक पटीने जास्त आहे राव!!

डॉलरचा भाव अमुक वाढला, रुपया तमुक भावाने पडला अशा गोष्टी अनेकदा कानावर पडतात. मग वाटतं,  फॉरेनला जाण्याचं आपलं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. जसा रुपयापेक्षा डॉलर वरचढ आहे, तसाच जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथे आपल्या रुपयाची किंमत कित्येक पटीने जास्त आहे. आणि सुखद बातमी म्हणजे हे देश पर्यटनासाठी अगदी बेस्ट चॉईस आहेत राव.

आपण आज बघणार आहोत असे १० देश जिथे जाऊन तुम्हालाही श्रीमंत झाल्यासारखं वाटेल!!

१. व्हिएतनाम

१ रुपया = ३५३.७८ व्हियेतनाम डॉंग

सुंदर समुद्र किनारे, व्हिएतनामी गावे, स्ट्रीट फूड. वेगळी संस्कृती. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही व्हिएतनामला नक्की भेट देऊ शकता.
 

२. श्रीलंका

१ रुपया = २०७ इंडोनेशियन रुपिया

आपल्या चलनाची आणि इंडोनेशियन चलनाची तुलना बघता आपण काही हजार रुपयांत इंडोनेशिया फिरून येऊ शकतो. इंडोनेशिया आणि आपलं एक वेगळं नातं म्हणजे तिथे अनेक प्राचीन देवी देवतांची मंदिरं आढळून येतात.

४. कोस्टा रिका

१ रुपया = ८.९६ कोस्टा रिका कॉलोन

हा एक मध्य अमेरिकन देश आहे. सुट्यांमध्ये निसर्गाची मजा घ्यायची असेल, तर कोस्टा रिका तुम्ही निवडू शकता. या देशातल्या जैवविविधतेसाठी हा देश ओळखला जातो.

५. कंबोडिया

१ रुपया = ६३.६९ कंबोडियन रियाल

प्राचीन मंदिर आणि संस्कृती जपलेला कंबोडिया एक सुखद अनुभव देऊन जाईल. कंबोडिया मध्ये १ रुपयाच्या बदल्यात चक्क ६३ रियाल मिळतायत. 

६. हंगेरी

१ रुपया = ४ हंगेरियन फॉरेंट
युरोपची सफर महागडी असू शकते, पण हंगेरीमध्ये तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही. आतली गोष्ट म्हणजे हंगेरीची वाईन फेमस आहे राव!!

७. साऊथ कोरिया

१ रुपया = १७.६७ साउथ कोरियन वॉन

या देशात तुम्हाला सर्व काही मिळेल. चांगली टेक्नोलॉजी, उत्तम कोरियन फूड, सुंदर निसर्ग आणि खरेदीसाठी स्वस्त आणि मस्त. आणि हो एका रुपयाच्या बदल्यात १७ कोरियन वॉन मिळत आहेत. मग जाणार का साऊथ कोरियाला?

८. जपान

१ रुपया = १.७० जपानी येन

जपानबद्दल वेगळं काही सांगायला नको. वेगळी संस्कृती, प्रगत तंत्रज्ञान, जॅपनीज फूड, जैवविविधता. आपल्या रुपयाची किंमत या देशात किंचित जास्त आहे. 
 

९. आइसलँड

१ रुपया = १.६६ क्रोना (आइसलँडचे चलन)

या देशात जंगले नाहीत, पण पर्वतराजी भरपूर आहे. हाडं गोठवणारी थंडी इथे पडते. नावावरून समजलं असेलच तुम्हाला. पण इथला उन्हाळा सुखद असतो हे मात्र खरं.

१०. पेरुग्वे

१ रुपया = ८८.२४ गुआरानी (पेरूचे चलन)

पेरुग्वे हे नाव देखील गमतीदार आहे. हे नाव पोपटावरून पडलं असं म्हटलं जातं. हा दक्षिण अमेरिकेतला एक रम्य देश आहे. 

 

तर मंडळी हिशोब लावा आणि ठरवा या उन्हळ्यात कुठे जायचं!!

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा