computer

या १४ वर्षाच्या मुलीने सुरु केलेली कंपनी मोठ्यांना पण लाजवेल !!

१४ वर्षांचे असताना आपण काय करत होतो आठवतं का? आठवायचं काय म्हणा? १४ वर्षं वय म्हणजे खेळण्या - बागडण्याचे वय!! या वयातली मुलं खोड्या करतानाच चांगली वाटतात. जास्तीत जास्त त्यांनी एखादी मोठी परीक्षा पास केल्यास आनंद होतो, पण या वयातील मुलीने स्वतःची कंपनी सुरू केली तर?

एका १४ वर्षांच्या मुलीने चक्क स्वतःची कंपनी सुरू केली आहे राव.

फिलिपाईन्समधील अँटीपोलो शहरातल्या इसाबेल सिइह या मुलीने कोडींग कंपनी सुरू केली आहे. इसाबेलचा गणितात चांगला जम बसला होता, ही गोष्ट तिच्या शिक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी कोड अकॅडमी नावाची वेबसाईट दाखवली. आणि इथून तिने कोडिंग शिकायला सुरुवात केली. तिने अवघ्या १० वर्षात कोडींग शिकून घेतली होती.

पण ती कोडिंग शिकून थांबली नाही, आपल्यासारखे इतर मुलींनी पण कोडिंग शिकावे यासाठी तिने स्वतःची कंपनी काढायचे ठरवले, आणि गर्ल्स विल कोड या नावाने कंपनी सुरू केली. इसाबेलने कमी वयात जावास्क्रीप्ट, HTML यांच्यासारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायला सुरुवात केली होती. पुस्तके, वेबसाईट्स,  ऑनलाइन ट्यूटर्सचा या सगळ्यांचा वापर करुन तिने कोडिंगवर प्रभुत्व मिळवलंय. 

लहान मुलांना प्रोग्रॅमिंग करण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून बरेच पालक मुलांना स्क्रॅच ज्युनियर नावाची प्रोगेमिंग लँग्वेजची ओळख करुन देतात. इसाबेलसुद्धा ही स्क्रॅच ज्युनियर वापरते. आपल्याकडे मोठ्या लोकसुद्धा इंटरनेट मिळाले की टिकटॉक व्हिडिओ बनवतात. पण या दहा वर्षांच्या मुलीने जे केलंय त्याला तोड नाही. 

अरे हो, हे वाचून आपल्या किंवा नात्यातल्या कच्च्याबच्यांना स्क्रॅच ज्युनियरची ओळख करुन द्यायची असेल, तर हे वेबसाईट पाहाच. http://scratchjr.org/learn/tips/sample-projects

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required