computer

अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या बागेत २०,०००० रिकाम्या खुर्च्या का ठेवण्यात आल्या होत्या?

चीनमधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आख्या जगाला भंडावून सोडले आहे. गेल्या सात महिन्यांत आपल्यातल्या प्रत्येकाच्या मित्रमंडळींपैकी, नातेवाईकांपैकी कोणाला ना कोणाला ह्या विषाणूची लागण झाल्याचे आपण सर्वांनी ऐकले आहे. काही लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंही आहे. काही लोकांना आपल्या मित्र आणि आप्तेषांचं अंत्यदर्शनही घेता आले नाही. अंत्यविधी करता आले नाहीत की सांत्वन करण्यासाठी कोणाकडे जाता आले नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी ही सल आहेच.

कोरोनामुळे आपल्यातून निघून गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ अमेरिकेत ४ ऑक्टोबर २०२० रोजी पहिला राष्ट्रीय कोविड-१९ स्मृतिदिन पाळण्यात आला. व्हाईट हाऊसच्या मागे २०,००० रिकाम्या खुर्च्या ठेवण्यात आल्या. यातली प्रत्येक खुर्ची कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या दहा लोकांचे प्रतिनिधित्व करत होती. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७८ लाखांच्या आसपास आहे. पैकी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २१ लाखांच्या आसपास आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि ज्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

"तुम्ही कुठेही गेलेले नसून आजही आमच्या हृदयात जिवंत आहात.” हा भावनिक संदेश तिथे जमलेल्या लोकांनी कोरोनामुळे निघून गेलेल्या लोकांसाठी दिला.
ह्या कार्यक्रमाच्या होस्ट गायिका दिओन वॉरविक ह्यांनी डॉक्टर आणि नर्सेस या सर्वांचे आभार मानले. तसेच महामारीच्या काळातील शासनाच्या कारभारावर टिका देखील केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही नुकतीच कोरोना विषाणूची बाधा झाली होती. काही दिवसांत ते कोरोनामुक्तही झाले. कोरोनामुक्त झाल्यावर त्यांच्या एका ट्वीटमध्ये त्यांनी कोरोनाची तुलना साध्या तापासोबत केली. त्यामुळे ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कोरोनामुळे गमावले आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांनतर लगेचच हा स्मृतीदिन पाळण्यात आला.

सोशल मीडिया युजर डीजे कोईसलेर ह्याने हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. सोबत लिहिले होते की,”मृत्युमुखी पडलेल्या २० लाख आणि अधिक लोकांच्या स्मरणार्थ, २०००० खुर्च्या.” काही तासांतच हा फोटो व्हायरल झाला. लोकांनी या फोटोवर खूप भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोबत प्रशासानावरचा आपला रागही तीव्र शब्दात व्यक्त केला आहे. बऱ्याच प्रतिक्रियांमध्ये आरोग्य विषयक सोयी सुविधांचा तुटवडा, उपचारासाठी हॉस्पिटल्सकडून केली जाणारी भरमसाट पैशांची मागणी, वाढत जाणारा प्रादुर्भाव ह्या सर्व गोष्टींवरील असमाधानही व्यक्त केले आहे.

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींना बोभाटाचीही श्रद्धांजली!!

 

लेखिका : स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required