अवघ्या २३ वर्षांची कांदा शेतकऱ्याची लेक स्टार्टअपद्वारे बदलतेय कांदा विक्रीचा चेहरामोहरा!!

लासलगांव. केवळ भारतातलीच नव्हे तर आशियातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ! याच लासलगांवमध्ये जन्मलेली कल्याणी शिंदे नावाची तरुण उद्योजक आपल्या प्रयत्नांनी अत्यंत अस्थिर असणाऱ्या कांद्याच्या बाजारपेठेत स्थिरता आणण्याचा प्रयत्न करतेय. नक्की काय आणि कसे करतेय, तिच्या योजना आणि समोरच्या अडचणी काय आहेत हे सर्वकाही आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
कांदा म्हटलं अनेकजणांना आठवतं ते डोळ्यात येणारं पाणी! हाच कांदा आपल्या अस्थिर बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतदेखील पाणी आणतो! कांद्याचा बाजारभाव कधी गगनाला भिडेल आणि कधी जमिनीवर आपटेल कोणालाच सांगता येणार नाही! पदवीचं शिक्षण घेत असताना कल्याणी याच प्रश्नावर विचार करत होती. तिचे वडीलदेखील या कांद्याच्या किंमतीमुळे त्रस्त होते. आणि हा प्रश्नच तिला उद्योगाच्या एका नवीन संकल्पनेकडे घेऊन गेला!
कल्याणी म्हणते, "मी जेव्हा पाहिलं की कांद्याच्या बाजारभावात तब्बल आठशे टक्यांपर्यंत चढउतार होत असतो तेव्हा मला राहवलं नाही आणि मी या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिले. दुसऱ्या पिकांचा, उदाहरणार्थ, आपण जर द्राक्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांना साधारण अंदाज असतो की यातून आपल्याला किती उत्पन्न मिळणार आहे. परंतु कांद्याचं तसं नाही. कांद्यात तुम्हाला लागली तर लॉटरी लागते, नाहीतर त्याचा सरळ कचरा होऊन जातो. तरीसुद्धा अनेक शेतकरी यावर्षी तरी भाव मिळेल अशी आशा ठेवून दरवर्षी कांदा लागवड करतात!"
इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना कल्याणीची निवड टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या नाशिकच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर नावाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये झाली होती. त्याचवेळी तिचं लक्ष उत्पादन चांगलं असून आणि स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याला मागणी असूनही शेतकरी त्रस्त आहेत या प्रश्नाकडे वेधले गेले! तिला लक्षात आलं की खरा प्रश्न कांद्याच्या साठवणुकीचा आहे. तेव्हा यातूनच जन्मलं तिचं नवं स्टार्टअप "गोदाम इन्नोव्हेशन्स"
गोदाम इन्नोव्हेशन्स कसं काम करतं?
कांद्याच्या लागवडीपासून ते त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत साधारण चार महिने, म्हणजेच एकशे वीस दिवसाचा कालखंड जातो. पूर्ण वाढ झालेला कांदा नंतर साधारण सहा ते आठ महिन्यांसाठी कोठारांमध्ये साठवला जातो. या कोठारांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला सुरुवात होते. कारण कल्याणीच्या असं लक्षात आलं कि जर एखाद्या शेतकऱ्याने दहा किलो कांदा या गोदामात साठवला तर त्यातला जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कांदा खराब होऊन जातो. तेव्हा तिने या साठवणुकीच्या प्रश्नावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
तिने शोधली early-stage startup leverages Internet of Things (IoT) technology. हे तंत्र सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारा गॅस शोधते आणि शेतकऱ्यांना त्याची पूर्वकल्पना देऊन सावध करते! यामुळे कांद्याच्या खराब होण्यात एकूण वीस ते पंचवीस टक्के घट होते.
कांद्याच्या साठवणुकीवर उत्तर शोधून कल्याणीने शेतकऱ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. शेतकऱ्याच्याच कुटुंबातून आल्यामुळे तिला हे सहजसाध्य झालं. त्याचबरोबर तिने लासलगांव सोडून इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांशीही संपर्क साधला. कारण वेगवेगळ्या गावातल्या लोकांना साठवणूकीचे वेगवेगळे प्रश्न त्रस्त करत होते.
कल्याणीच्या स्टार्टअपने Directorate of Onion and Garlic Research (DOGR), National Agricultural Cooperative Marketing Federation of India (NAFED), आणि National Bank for Agriculture and Rural Development (नाबार्ड) शी पार्टनरशिप केली आहे जेणेकरून या संस्था वापरत असलेल्या कोठारांचा तिला अभ्यास करता येईल. "सरकार कोठारांसाठी शेतकऱ्यांना देत असलेलं अनुदानही आम्ही पाहतो जेणेकरून या संस्थांच्या नजरेतून आम्हाला हे सगळं समजून घेता येईल." असं कल्याणी सांगते.
कल्याणी सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करते. तिच्या म्हणण्यानुसार जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीची कोठारे आहेत. नवीन आधुनिक पद्धतीची गोदामे उभारण्यापेक्षा कल्याणीने शेतकऱ्यांच्या जुन्या कोठारांमध्येच आधुनिक बदल केले. उदाहरणार्थ एअर फ्लो, व्हेंटीलेशन आणि फ्लोअर स्पेसिंग अशा बदलांमुळे साठवलेल्या कांद्यात पाण्याचा ३० टक्के अंश राहील.
आता पुढचा प्रश्न हा होता की शेतकरी कांद्याचा वास घेऊन तो अजून चांगला आहे की नाही हे ठरवत असत. या पद्धतीत जवळपास 30 टक्के चांगला कांदासुद्धा टाकून दिला जाई. कल्याणीच्या स्टार्टअपने काय केलं, तर कोठारांमध्ये IoT उपकरण बसवलं. या उपकरणामुळे जो कांदा साडणार आहे तो आधीच शोधून शेतकऱ्यांना सांगितलं जातं. शेतकऱ्यांकडून लगेच तो कांदा बाजूला काढला गेला तर इतर कांदे खराब होण्यापासून वेळीच वाचवले जाऊ शकतात.
कल्याणीच्या स्टार्टअपमध्ये कांदा साठवण्याच्या क्षमतेनुसार स्टार्टअप सेवा तीन प्रकारात दिली जाते - हाय,मिडीयम आणि लो. या तिन्ही प्रकारात हार्डवेअर स्थापनेसाठीचा खर्च वेगवेगळा आहे. हाय प्रकारात हा खर्च १ ते १.२ लाखांपर्यंत जातो, मिडियम सेवा ७०,००० ते ९०,००० मिळते आणि लो सेवेसाठी ३०,००० ते ४०,००० आकारले जातात. या सगळ्या सेटअपचा महिन्याचा खर्च म्हणून ५००० ते १०,००० आकारले जातात.
कल्याणीचं स्टार्टअप शेतकऱ्यांसाठी B2B म्हणजेच बिझनेस टू बिझनेस मॉडेलमध्ये काम करतं. यासाठी त्यांनी टाटा स्टीलशी भागीदारी केली आहे. टाटा स्टीलच्या मदतीने त्यांनी सोलारवर काम करणारी गोदामे बांधली जातात. कल्याणी म्हणते,"अन्नधान्य साठवणूकीचं भविष्य हे सामुदायिक गोदामांमध्ये आहे आणि मी सध्या हेच समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला असं सामुदायिक गोदाम हवं आहे, जे शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर माल गोळा करू शकेल. तसेच शेतकरी वैयक्तिक गोदामांकडून सामुदायिक गोदामांकडे जायला थोडा वेळ जावा लागेल."
ही कल्पना मांडल्यावर २०१८ मध्ये Directorate of Onion and Garlic Research Centre to conduct a pilot कडून कल्याणच्या स्टार्टअपला ३ लाखांचा निधी प्राप्त झाला. तसेच अनलिमिटेड इंडियाकडूनही तिला २ लाख रुपये निधी मिळाला होता.
गोदामांसाठी फंडिंग आणि गोदामांसमोरील आव्हाने
एक उद्योजक म्हणून कल्याणी समोरील सर्वात मोठे आव्हान हेच आहे की तिच्या स्टार्टअपने तयार केलेली उत्पादने आणि उपकरणे प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर वापरून सिद्ध करणे. कारण मार्च आणि एप्रिल असे दोनच महिने कांदा कापणीचा काळ असतो. दरवर्षी त्या काळात तिला तिची सर्व नवीन उपकरणे आणि उत्पादने वापरून पहावी लागतात. यावर्षी तर कोविड १९ मुळे सर्वकाही ठप्प झाले आहे.
एक तरुण पदवीधर म्हणून जॉब करण्याऐवजी स्वतःच स्टार्टअप चालू करणे आणि त्याबाबत घरच्यांची समजूत काढून त्यांचं मन वळवणे किती अवघड आहे हे कल्याणीला चांगलंच माहिती आहे! ती म्हणते हा सगळा प्रवास तिला शिकवत राहील आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहील!
लेखक : सौरभ पारगुंडे