computer

सीट-बेल्टचं चिन्ह वापरून तुमच्या नकळत पाठवले जातात ३ गुप्त संदेश!!

विमानात लावलेले सीट-बेल्टचे चिन्ह हे समजायला सोप्पे असतात. चिन्ह पेटलेलं असेल तेव्हा सीट-बेल्ट बांधायचे आणि बंद असेल तेव्हा सीट-बेल्ट काढून टाकायचे, पण या चिन्हाचा एवढा एकच अर्थ होतो का ? तर नाही. सीट-बेल्टच्या चिन्हाद्वारे पायलट कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असतो. 

या साधारण सीट-बेल्टच्या सहाय्याने पायलट कर्मचाऱ्यांना ३ प्रकारचे मेसेज पाठवत असतो. त्यांचा अर्थ प्रवाशांना समजत नाही, पण कर्मचाऱ्यांना तो बरोबर समजलेला असतो. चला तर पाहूया हे ३ सिक्रेट मेसज असतात तरी काय.

१. उड्डाणाच्यावेळी.

उड्डाणाच्यावेळी सर्वात आधी प्रवाशांना सीट-बेल्ट घालण्याच्या सूचना मिळतात. अशीच सूचना कर्मचाऱ्यांनाही मिळते. त्यासाठी दोनवेळा ‘डिंग’ असा आवाज येतो आणि त्यानंतर सीट-बेल्टचं चिन्ह चमकतं. याचा अर्थ आता कर्मचाऱ्यांनाही आपापल्या सीट वर जाऊन बसण्याची व सीट-बेल्ट घालण्याची गरज आहे.

२. लँडिंगच्यावेळी

उड्डाणाच्यावेळी जसा दोनदा ‘डिंग’ असा आवाज येतो तसाच लँडिंगच्यावेळी पण येतो. एका विमान कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आपल्या सीटवर बसण्याची ही शेवटची सूचना असते.

३. विमानाची लँडिंग झाल्यानंतर

विमान लँड झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला सीट-बेल्ट न काढण्याची सूचना दिली जात असते, तेव्हा सीट-बेल्टचं चिन्ह अचानक बंद होतं. याचा अर्थ असा होतो की विमान सुरक्षितपणे उतरलेलं आहे. हे केवळ कर्मचाऱ्यांना समजण्यासाठी. प्रवाशांना मात्र त्यावेळीही जागेवरून उठण्याची मुभा नसते, कारण विमान त्याक्षणीही कोणत्याही कारणास्तव हलू शकतं. 

तर मंडळी, पुढच्यावेळी विमान प्रवास कराल तेव्हा या गुप्त सूचनांवर नक्की लक्ष ठेवा.

सबस्क्राईब करा

* indicates required