computer

मुंबई पुणे दरम्यान असलेले ६ फर्स्टक्लास ढाबे !!

दूरचा प्रवास आणि ढाब्यावरचं जेवण म्हणजे ‘क्या बात है !!’....ढाब्यावर जेवण्याची मजाच वेगळी असते. तिथल्या जेवणाची चव आणि हॉटेल मधल्या जेवणाची चव यामध्ये खूप फरक दिसून येतो. ही चव घरच्या चवीशी मिळतीजुळती असल्याने ढाबा आपल्याला जास्त जवळचा वाटतो. मुंबई पुणे प्रवास करताना रस्त्याच्याकडेला असे अनेक ढाबे आपल्याला दिसतील. पण यातील सर्वात बेस्ट ढाबे कोणते ? माहित नसेल तर खाली दिलेली लिस्ट एकदा बघाच.

चला तर आज बघुयात मुंबई पुणे दरम्यान असलेले ६ फर्स्टक्लास ढाबे जिथली चव एकदा तरी चाखायलाच हवी !!

१. सन्नी दा ढाबा

पंजाबी पद्धतीच्या जेवणासाठी सन्नी दा ढाबा प्रसिद्ध आहे. इथला पनीर बटर मसाला एकदा तरी ट्राय करून बघाच !!

पत्ता : मुंधावरा फाटा, जुना मुंबई पुणे महामार्ग, लोणावळा.

२. शीतल दा ढाबा

शीतल दा ढाबा मध्ये मिळणारी चिकन बिर्याणी विशेष प्रसिद्ध आहे. उत्तर भारतीय, मुघलई आणि इथला प्रसिद्ध असलेला गजर का हलवा  तुमचा प्रवास लाजवाब करेल.

पत्ता : कार्ला, लोणावळा, मुंबई पुणे महामार्ग.

३. आस्वाद ढाबा

चायनीज आणि भारतीय पद्धतीच्या जेवणाची इथे चंगळ असते. इथली खासियत म्हणजे पनीर रेशमी कबाब आणि मटन बिर्यानी.

पत्ता : टोल प्लाझा, मावळ, जुना मुंबई पुणे महामार्ग, लोणावळा.

४. भजन सिंग दा ढाबा

भजन सिंग दा ढाबा नॉन वेज खवय्यांसाठी स्वर्ग आहे. इथे उत्तर भारतीय आणि चायनीज पद्धतीच्या मटन आणि चिकन रेसिपीज चाखायला मिळतील. 

पत्ता : सोमाटणे टोल प्लाझा, जुना मुंबई पुणे महामार्ग, तळेगाव दाभाडे, पुणे.

५. सिद्धू पंजाबी ढाबा

पंजाबी आणि इतर भारतीय पद्धतीच्या जेवणासाठी सिद्धू पंजाबी ढाबा प्रसिद्ध आहे. हा ढाबा त्याच्या शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

पत्ता : कार्ला फाटा जवळ, जुना मुंबई पुणे महामार्ग, लोणावळा.

६. टोनी दा ढाबा

मुंबई पुणे प्रवास करताना टोनी दा ढाबा हा अनेकांचा आवडता ढाबा आहे. इथला पनीर बटर मसाला, बटर चिकन, चिकन टिक्का इत्यादी डिश म्हणजे निव्वळ लाजवाब असतात.

पत्ता : नायगाव, कामशेत, जुना मुंबई पुणे महामार्ग, पुणे.

 

मुंबई पुणे प्रवास करताना या ढाब्यांवर एकदा तरी नक्की जाऊन या...आणि हो, गेलात की एक सेल्फी पाठवायला विसरू नका राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required