computer

कुत्रा पाळायचा आहे? मग या ९ गोष्टींचा विचार करायलाच हवा..

घरात एखादा पाळीव प्राणी असलेला कुणाला आवडत नाही? मग तो प्राणी कुत्रा असो वा मांजर. पण घरात पाळीव प्राणी पाळताना अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. जेव्हा आपण कुत्रा पाळतो तेव्हा त्याची काळजी घेणं, त्याला वेळ देणं, त्याला फिरवून आणणं अशी अनेक कामे त्याबरोबर करावीच लागतात. यासाठी कुत्रा पाळण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

 

१.    तुमच्याकडे वेळ आहे का?
जेव्हा तुम्ही घरी एखादं कुत्र्याच पिल्लू आणता तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्यासोबत खेळण्यासाठी पुरेसा वेळ आहे का याचा आधी विचार करायला हवा. तुम्हाला त्या पिल्लाला बाहेर न्यायला, त्याला अंघोळ घालायला, त्याला खायला घालायला, त्याची पूर्णपणे काळजी घ्यायला वेळ असायलाच हवा. तरच तुम्ही एखादं पिल्लू घरी आणा.
२.    तुमच्याकडे पुरेशी जागा आहे का?
कुत्रा पाळण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा आहे का याचा विचार देखील व्हायला हवा. कुत्र्यांना सुद्धा स्वतःच्या जागेची गरज असते. तुमच्याकडे कुत्रा पाळण्यासाठी पुरेशी जागा असायला हवी.
.

३.    तुमच्या घरच्यांचे आणि तुमच्या घरमालकाचे मत घ्या.
तुम्ही जर स्वतःच्या घरात राहत आहात तर कुत्रा पाळण्याआधी घरच्यांचं मत लक्षात घ्या. त्यांना घरात कुत्रा हवा आहे कि नको हे विचारा. जेव्हा तुम्ही भाड्याच्या घरात राहात असता तेव्हा तुमच्या घरमालकाला विचारणण, त्यांची परवानगी घेणं महत्वाचं आहे.
४.    तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना कोणत्या प्रकारच्या अलर्जी आहेत का?
जर घरात कुणाला असल्याही प्रकारची असेल तर कुत्रा पाळण्यआधी सल्ला जरूर घ्या.
 

५.    खर्चाचा विचार करा
एखादा प्राणी पाळायचा म्हणजे अर्थात खर्च आलाच. त्याच्या खाण्याचा, त्याच्या औषधांचा, त्याचे साबण, त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी यांच्यासाठी होणारा खर्च तुमच्या बजेटमध्ये आहे की नाही याचा देखील विचार करा.
६.    पिल्लू घरी आणण्याची योग्य वेळ कोणती?
कुत्र्याचं पिल्लू ८ ते १२ आठवड्यांचं झाल्यानंतर तुम्ही अडॉप्ट करू शकता. पिल्लू त्याच्या आई सोबत असणं महत्वाचं असतं. पिल्लू आईसोबत असताना अनेक चांगल्या सवयी शिकत असत.
 

७.    प्राण्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्राण्यांचे डॉक्टर तुम्हाला कोणत्या प्रजातीचा कुत्रा घ्यायचा, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याचं खाणं-पिणं या सगळ्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतात.
८.    पूर्व तयारी.
जेव्हा तुम्ही कुत्रा पाळण्याचा निर्णय घेता तेव्हा त्याची थोडी पूर्वतयारी देखील करणं गरजेचं आहे. त्याला लागणारी खेळणी, डॉग फूड, त्याचा बेड, त्याच्या अंघोळीसाठी लागणारे साबण/शाम्पू, त्याला बांधण्यासाठी लागणारी कॉलर अशा अनेक गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवायला हवी.
९.    डॉग प्रूफ घर
घर डॉग-प्रूफ बनवण्यासाठी तुम्ही तुमचे कार्पेट गुंडाळून ठेऊ शकता. जेणेकरून तुमचे पिल्लू कार्पेट वरती शी-शू करून ते खराब करू शकणार नाही. त्याच बरोबर घरात असणारे क्लिनिंग सप्लाईज जसे की फरशी पुसण्याची औषधे, दुसरी काही औषधे, साबण, हार्डवेअर टूल्स अशा धोकादायक गोष्टीपर्यंत ते पिल्लू पोहोचणार नाही याची काळजी घ्या

सबस्क्राईब करा

* indicates required