computer

या ९ वर्षांच्या मुलीने असं काय केलं की तिला मणिपूरची 'ग्रीन अम्बॅसिडर' करण्यात आलंय ??

काही दिवसापूर्वी मणिपूर येथील लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिची खेळणी हिसकावल्याने किंवा तिला मारल्याने ती रडत नव्हती तर तिने लावलेली झाडं तोडल्याने ती रडत होती. हा व्हिडीओ मन हेलावणारा होता.

मंडळी, नवीन बातमी अशी आहे की तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला मणिपूर सरकारने “ग्रीन अम्बॅसिडर” बनवायचं ठरवलंय. ती आता ग्रीन मणिपूर मिशनचा चेहर असणार आहे. याखेरीज राज्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांचीही ती अम्बॅसिडर असणार आहे.

ती आहे तरी कोण ?

तिचं नाव आहे ‘व्हॅलेन्टीना एलंगबम’. तिचं वय ९ वर्ष आहे. ती जेव्हा पहिलीत होती तेव्हा तिने दोन झाडं रस्त्याच्या कडेला लावली होती. त्या भागात आता रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली सगळी झाडं तोडण्यात आली.

व्हॅलेन्टीनाला हे जेव्हा समजलं तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. तिने एवढी वर्ष जपलेली झाडं एका दिवसात कापून टाकण्यात आली होती. राज्याचा पर्यावरण अम्बॅसिडर म्हणून तिच्यापेक्षा चांगली निवड कोणती असणार होती.

हे पाहा तिचे अम्बॅसिडर झाल्यानंतरचे फोटो.