मरणानंतरही आता लागणार 'आधार' चा आधार!

रोटी, कपडा आणि मकान या तीन गोष्टी ह्या नेहमीच जीवनावश्यक वस्तू म्हणून मानल्या गेल्यात. पण आता त्यात एक महत्वाची गोष्ट ऍड करायची वेळ आली आहे. पॅन, गॅस, बँक खाते, फोन नंबर अशा अनेक गोष्टींसाठी बंधनकारक असलेलं आधार कार्ड आता मृत्यूनंतरही महत्वाचं ठरणार आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची नोंदणी ही सगळ्यात महत्त्वाची कायदेशीर बाब असते. तर आता या मृत्यूचा दाखला घेताना मृत व्यक्तीचा आधार कार्ड नंबर सांगणे गरजेचे ठरणार आहे. हा प्रकार १ ऑक्टोबरपासून लागू होणार असे आज केंद्रीय गृहखात्यानं सांगितलंय. सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळे ओळख चोरी म्हणजेच Identity theft ला आळा बसणार आहे.

जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल किंवा त्याचा आधार क्रमांक माहीत नसेल तर मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला एक प्रतिज्ञापत्र देण्याची सोय असणार आहे. आणि खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबर फार काही लांब नाही आणि तोवर तुमच्या मृत्यूच्या दाखल्याची वेळही येणार नाही. पण हे सरकार अजून कशाकशाला आधार जोडायला लावणार आहे हे माहीत नाही. तर मंडळी अजूनही तुमचं आणि तुमच्या घरी कुणाचाही आधार कार्ड नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required