computer

भारतातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी आली आहे...पहिल्या ३ क्रमांकावर कोण आहे पाहा !!

प्रदूषण हा मुद्दा सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला प्रदूषण कमी झाल्याचं आणि ओझोनचं भगदाड भरून निघाल्याच्या बातमी येत होत्या. पण लॉकडाऊन उघडलं आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे तशीच आहे. नुकताच भारताचा एयर क्वालिटी इंडेक्स जाहीर झाला आहे. हा अहवाल नक्कीच काळजीत भर पाडणारा आहे.

सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल ब्युरोकडून (सिपीसीबी) दररोज ४ वाजता एयर क्वालिटी इंडेक्स जाहीर करण्यात येत असतो. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार देशातील १०८ शहरांची आकडेवारी गोळा केली असता गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, बुलदंशहर, कानपुर ही शहरं गंभीर प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये येतात.

नोएडा आणि ग्रेटर नोएडा ही दोन्ही शहरं उत्तर प्रदेश आणि दिल्ली सीमेजवळ आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा प्रचंड वेगाने विकास झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे तिथे प्रदूषणालाही गती मिळाली आहे.

एयर क्वालिटी इंडेक्सच्या अहवालानुसार ग्रेटर नोएडा हे देशातले सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद असून नोएडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. अगदी अचूक आकडेवारी सांगायची झाली तर गाझियाबादच्या हवेचा दर्जा ४०७, ग्रेटर नोएडा ४१८, नोएडा ४०५ आणि फरीदाबाद ३५९ असा आहे. हे आकडे वरील शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या ही प्रचंड वाढली असल्याचे दाखवत आहेत.

सिपीसीबीच्या म्हणण्यानुसार एयर क्वालिटी इंडेक्स एवढा ढासळलेला असणे हे अनेक रोगांना आमंत्रण ठरू शकतो. श्वसन आणि फुफुसासंबंधी आजार होण्याची शक्यता देखील अशा परिस्थितीत असते. तसेच अतिशय सक्षम लोकांना देखील या प्रदूषणामुळे आजारपणाचा धोका असतो.

मध्यंतरी भारतात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील मुलांच्या फुफ्फुसाचा आकार हा अमेरिकन मुलांच्या फुफ्फुसाच्या आकाराच्या मानाने १५ टक्के कमी असतो. यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे प्रदूषण. भारतात प्रदूषण हा विषय गांभीर्याने घेऊन त्याबद्दल उपाययोजना करण्याची वेळ निघून चालली आहे. हेच या सर्वांमधून समोर येत आहे.

 

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required