रॉन्ग नंबरने जुळवलं नातं : त्यानं केलं अॅसिड हल्ला झालेल्या तरूणीशी लग्न

मंडळी, साधारणतः लग्न करताना आपण सगळेच आपल्या भावी जोडीदाराविषयी छोट्यामोठ्या आशा-अपेक्षा ठेवतो. त्यातल्या त्यात ती व्यक्ती सुंदर असावी, ही अपेक्षा तर आपल्या प्रत्येकाचीच असते. पण बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्मनाची सुंदरता कितीतरी श्रेष्ठ असते. आणि याचीच प्रत्यक्ष अनुभूती देतीय राहूल आणि ललिताची ही गोड जोडी.

स्त्रोत

सर्वात आधी आपण ललिताबद्दल जाणून घेऊया. २६ वर्षांची ललिता बन्सी ही युपीच्या आजमगड शहरात राहणारी एक दुर्दैवी तरूणी आहे. दुर्दैवी यासाठी म्हणावं लागतंय कारण २०१२ मध्ये तिच्याच भावंडानी तीच्यावर अॅसिड हल्ला केला. तेही साध्याशा घरगुती कारणामुळं! आतापर्यंत तिच्यावर १७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि अजूनही उपचार सुरू आहेत. तिच्या चेहर्‍याची अवस्था काय आहे हे आपण फोटोत दिसत आहेच. सद्या तिची देखभाल मुंबईच्या साहस फाऊंडेशन या एनजीओकडून केली जाते.

स्त्रोत

आता आपण पाहूया राहूल आणि ललिताची प्रेमकथा. दोन महिन्यापूर्वी ललिताला राहूल कुमार नावाच्या अनोळखी व्यक्तीकडून कॉल आला, जो मुळात रॉन्ग नंबर होता. थोड्याच दिवसांत दोघांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात, आणि काल दोघांचं लग्नही झालं!! हो, एका रॉन्ग नंबरमुळं ललिताला तीच्या जीवनाचा आधार मिळाला असं आपण म्हणू शकतो. राहूल मालाडमध्ये एक सीसीटीव्ही अॉपरेटर म्हणून काम करतो. त्याच्या या निर्णयाला त्याच्या कुटूंबानेही साथ दिली आहे. जिथं ललितानं कधी आपल्या लग्नाची कल्पनाही केली नव्हती, जी आता सत्यात उतरली आहे. त्यामुळं तीही आनंदाने भारावून गेलीये.

स्त्रोत

विशेष म्हणजे ललिताच्या या लग्नाला अभिनेता विवेक अॉबेरॉयने हजेरी लावली होती. त्याने चक्क या दोघांना ठाण्यात फ्लॅट गिफ्ट दिलाय. याबरोबरच बॉलीवूडच्या अनेक मंडळींनी ललितासाठी मदतीचा हातही पुढे केल्याचं सांगण्यात येतंय.

स्त्रोत

मंडळी, एखाद्या फिल्मी कथेप्रमाणे भासणारी ही ललिताची कहाणी. राहूलनं निस्वार्थ प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आपल्यासमोर ठेवून एक चांगला आदर्श निर्माण केलाय. पण समाजातील विकृत मनोवृत्तींमुळे अशा अनेक ललिता देशाच्या कानाकोपऱ्यात अन्याय सहन करीत आहेत. हे थांबणं आवश्यक नाही का ?

सबस्क्राईब करा

* indicates required