computer

आधार कशाकशाला आणि कसा लिंक कराल? मुदत संपण्याआधी हे जरूर जाणून घ्या !!

मंडळी, सरकारच्या नियमानुसार काही महत्वाच्या सेवा वापरण्यासाठी आता आधारकार्ड  लिंक करणे आवश्यक आहे. पॅनकार्ड बरोबरच मोबाईल नंबर, बँक खाते इत्यादी सेवांना तुमचा आधारकार्ड लिंक असणं गरजेचं आहे. आधारकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने लवकरात लवकर कामाला लागायला हवं...पण राव, आधार लिंक कसा करायचा? कुठे करायचा ? यासाठी काय माहिती लागते ?

मंडळी चला जाणून घेऊ, आधार कशाकशाला आणि कसा लिंक करायचा !!

१. पॅनकार्ड

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी तुम्ही 'इनकम टॅक्स' च्या http://incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन तो लिंक करू शकता. या वेबसाईटवर डाव्या बाजूस ‘Link Aadhaar’ लिहिलेलं तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांक भरण्याचं ऑप्शन येईल. त्याचबरोबर आणखी माहिती भरण्याचे पर्याय असतील. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा आधारकार्ड पॅनकार्ड बरोबर लिंक होईल.

२. मोबाईल नंबर

तुमचं सिमकार्ड ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीच्या ब्रांच मध्ये जाऊन किंवा त्यांच्या ‘कस्टमर सर्व्हिस’ ला संपर्क साधून तुम्ही आधार मोबाईल नंबर बरोबर लिंक करू शकता.

३. बँक अकाउंट

बँक अकाउंट बरोबर आधार लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांचला भेट देऊ शकता. याशिवाय मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही तुम्ही आधार लिंक करू शकता. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून लिंक करण्याची प्रोसेस पुढील प्रमाणे आहे.

१. तुमच्या बँक अकाउंट मध्ये ‘लॉगइन’ करा

२. ‘अपडेट आधार’ या ऑप्शनवर क्लिक करा.

४. समोरच्या रकान्यात तुमचा आधारकार्ड नंबर आणि माहिती भरून सबमिट करा.

यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येतो. हा OTP भरल्या नंतर तुमचा आधार लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

४. म्युचुअल फंड

तुमचा म्युचुअल फंड अकाउंट आणि आधारकार्ड खालील प्रमाणे लिंक करता येईल.

१. https://www.camsonline.com/  किंवा http://www.karvycomputershare.com/  या दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटवर जा.

२. ‘Link Your Aadhaar’  या टॅब वर क्लिक करा.

३. आधारकार्ड नंबर आणि इतर माहिती भरून सबमिट करा.

४. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP भरल्यानंतर तुमचा आधारकार्ड आणि म्युचुअल फंड लिंक होईल.

५. इंश्युरंस पॉलीसी

इन्शुरन्स पॉलीसी बरोबर आधार ऑनलाईन लिंक करण्यासाठी तुमच्या इन्शुरन्स प्रोवायडरच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही आधार लिंक करू शकता किंवा तुमचा इन्शुरन्सच्या शाखेत जाऊन तुम्ही तो लिंक करू शकता. यावेळी तुमचा पॉलीसी नंबर आणि जन्म तारखेची माहिती देणे आवश्यक आहे.

तुम्हाला LIC पॉलसी आणि आधार लिंक करायचं असल्यास LIC च्या https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही लिंक करू शकता.

६. पोस्ट ऑफिस गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या NSC आणि PPF सारख्या स्कीम्स मध्ये गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला आधार लिंक करणे बंधनकारक आहे. यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल.

१. https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx  या पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन लॉगइन करा.

२. त्यावर आधार लिंक करण्यासाठीचा फॉर्म असेल तो डाऊनलोड करा.

३. फॉर्मवर विचारलेली माहिती भरून तो फॉर्म जवळच्या पोस्ट ऑफिसच्या ब्रांच मध्ये सबमिट करा.

 

मंडळी आधार लिंक कसं करायचं ते तर तुम्हाला समजलं असेलच पण या सगळ्यांची शेवटची तारीख काय आहे ? चला बघुयात !!

भाऊ, आता लागा कामाला !!

सबस्क्राईब करा

* indicates required