मराठी भाषा दिनानिमित्त खास आगरी बोलीतली कविता!! कधी वाचली होती का तुम्ही अशी कविता?

आपली मायबोली मराठीचे अनेक रंग आणि पोत आहेत. कधी मुंबई पुण्याची नागर भाषा तर कधी अनेक प्रादेशिक बोली भाषांतून ती प्रकट होत असते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेत तंजावूर पर्यंत अनेक बोलीभाषांच्या रुपात मराठी बोलली जाते. आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक खास कविता आगरी बोलीभाषेत !

ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू
न सपनाचे गावान शिराचू

तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा
न आभालान फीराचा

अमिताभ बच्चनसारका सांगाचा
'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी'

माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा
'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी '

बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान
लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान

वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला
लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय

कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता
नजर आढ्याला लावून जागीत व्हता

त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

ता.क. : कवीचे नाव अर्थातच काल्पनिक आहे. (चूकभूल द्यावी घ्यावी)

सबस्क्राईब करा

* indicates required