'एअरलिफ्ट'च्या खऱ्या हिरोचे निधन..

२ ऑगस्ट १९९०. सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला. दोनच दिवसात कुवेतचा पाडाव करून सद्दाम हुसेनच्या सैन्याने कुवेतचा पूर्ण ताबा घेतला.  कुवेतमध्ये लाखो भारतीय अडकून पडले होते. या भारतीयांच्या सुटकेची कथा आपण पडद्यावर "एअरलिफ्ट" या चित्रपटात बघितली असेलच. या चित्रपटात अक्षयकुमारने ज्या 'खर्‍या' हिरोची भूमिका केली आहे त्या हिरोचे म्हणजेच मुथ्थूनी मॅथ्यू यांचे आज निधन झाले.

रातोरात घरदार सोडून पळालेल्या या भारतीयांचे प्रचंड हाल होत होते. काही जणांकडे पासपोर्ट पण नव्हते. एअर इंडियाच्या विमानांना कुवेतमध्ये प्रवेश नव्हता. एकीकडे अमेरीकेने प्रतिहल्ला करण्याची तयारी सुरु केली होती. हे "ऑपरेशन डेजर्ट स्टॉर्म" सुरु होण्यापूर्वी भारतीयांची सुखरुप सुटका होणे आवश्यक होते.
१,११,७११ निर्वासितांचे प्रचंड हाल होत होते . अशा वेळी हजारो लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणारे "सनी टोयोटा" आज वयाच्या ८१ व्या वर्षी हे जग सोडून गेले आहेत.

अक्षयकुमारने ट्वीटरद्वारे आज त्यांना श्रध्दांजली अर्पंण करताना म्हटले आजे की "ही अत्यंत  दु:खद बातमी आहे. त्यांची भूमिका पडद्यावर साकारणे हा माझा सन्मान होता."

The real #RanjitKatiyal lost his battle with ALS last night. 1,70,000 families pray for you. #RIPSunnyMathew @akshaykumar @RajaMenon pic.twitter.com/Q5FfezzeFq

— Nikkhil Advani (@nikkhiladvani) May 21, 2017

सबस्क्राईब करा

* indicates required