तिला पाहून तुम्हीही म्हणाल... "खरंच अप्रतिम! तीही कोणापेक्षा कमी नाही!!"

मंडळी, आम्ही परत तेच सांगतोय. माणसाच्या बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्मनाची सुंदरता कितीतरी श्रेष्ठ असते. एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती तिला कशापासून काय बनवू शकते याचं आणखी एक भन्नाट उदाहरण घेऊन आम्ही परत आलोय. हा फोटो पहा...

स्त्रोत 

काय वाटतं तुम्हाला हा फोटो पाहून? एखादा एलियन? एखादा पुतळा? पेंटींग? कॉम्प्युटर ग्राफिक्स? चुकताय तुम्ही. खरंतर ती एक मॉडेल आहे! नाव आहे मेलनी गेडोस. आणि तिचं हे रूप पाहून जर तुम्हाला ही मेकअपची कमाल वाटत असेल तर तुम्ही परत चुकताय. ती वास्तवात तशीच आहे!

हो. खरंतर जन्मतःच तिला एक्टोडर्मल डिस्प्लेशिया नावाचा आजार जडलाय. या आजारामुळं तिचे केस, दात, नखे, हाडे, त्वचा इ. अवयवांचा विकासच झालेला नाही.

स्त्रोत

आपले तुटलेले ओठ, विकृत कान-डोळे यांना ठीक करण्यासाठी तिला लहानपणी जवळजवळ ४० शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या आहेत. 

स्त्रोत

स्त्रोत

पण आजची गोष्ट वेगळी आहे. आज ती अमेरिकेतल्या टॉपमॉडेल्सपैकी एक म्हणून गणली जाते. २८ वर्षांची मेलनी आपल्या कलाकारीच्या जोरावर अख्ख्या अमेरिकन फॅशन इंडस्ट्रीवर राज्य करते. तिचे हे फोटो पाहूनच तुम्हाला तिच्यातल्या सर्वोत्तम सौंदर्याची अनुभूती होईल... 

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

असं मॉडेलिंग करणं कुणाही येरागबाळ्याचं काम नाही मंडळी. मन खूष झालं ना? मग जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि पटकन शेअरही करा...

सबस्क्राईब करा

* indicates required