शिवजयंती निमित्त नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन यांचे मराठीत ट्विट!!!

१९ फेब्रुवारीला तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. देशभरात विविध कार्यक्रमातून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं. याच निमित्तानं पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ आणि बिग बी ‘अमिताभ बच्चन’ यांनी ट्वीट करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या दोन्ही दिग्गजांनी आपले ट्विट मराठीतून केले आहे.

नरेंद्र मोदींनी एकूण चार ट्वीट करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या :

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्त्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे.’ असे पहिले ट्वीट करून नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांचा गौरव केला.

 

'छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते.’ म्हणत महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याची स्तुती केली..

 

पुढे मोदी आश्वासन देत म्हणाले की ‘शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत.’

 

‘नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील.’ असे म्हणत मोदींनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची आठवण करून दिली.

 

अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेले शिवरायांविषयीचे काव्य :

*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
आई जिजाऊ पोटी!
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
रायगडावर तुम्ही ऊभारली
*... शिवराष्ट्राची गुढी!*
राजे तुम्ही नसता तर
*सडली असती हिँदुची मढी!*
तुम्हा मुळे तर आम्ही
*पाहतो देवळाचे कळस,*
तुम्ही नसता तर नसती
*दिसली अंगनात तुळस!*

||जय भवानी जय शिवराय ||
शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा

 

सबस्क्राईब करा

* indicates required