computer

अमृता शेरगिल यांच हे चित्र ठरलं आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी भारतीय कलाकृती...काय दडलंय या चित्रात?

जगभरात दक्षिण अमेरिकन महिला चित्रकार 'फ्रिडा काहलो' ही अत्यंत गाजलेली आहे. तिचे सेल्फ पोट्रेट्स जगभरात आजही अभ्यासली जातात. पारंपारिक आणि पाश्चात्य कलाप्रकाराचा सुंदर मिलाफ साधलेल्या भारतीय चित्रकार अमृता शेरगिलनाही भारतीय 'फ्रिडा काहलो' म्हटलं जातं. २० व्या शतकातल्या नव्या कल्पना, नव्या दृष्टीकोनाने आणि नव्या दमाने ज्या चित्रकारांची पिढी निर्माण झाली त्या पिढीतील महान चित्रकारांमध्ये अमृता शेरगिलचा यांचं नांव घेतलं जातं. 

२० व्या शतकातील नव्या कल्पना, नव्या दृष्टीकोनाने आणि नव्या दमाने ज्या चित्रकारांची पिढी निर्माण झाली त्या पिढीतील महान चित्रकारांमध्ये अमृता शेरगिल यांचा देखील समावेश होतो.  

अमृता शेरगिल यांचं काम अनन्यसाधारण आहे आणि सध्या त्या जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. याला कारणही तसंच आहे. अमृता शेरगिल यांचं "In the Ladies' Enclosure" हे चित्र तब्बल ३७.८ कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. हे चित्र सर्वाधिक महागड्या विकल्या गेलेल्या भारतीय कलाकृतींच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाऊन पोचलं आहे. Saffronart या नावाजलेल्या लिलाव कंपनीने नुकतंच काही प्रमुख भारतीय चित्रांचा लिलाव केला होता, त्यात अमृता शेरगिल यांच्या या प्रसिद्ध चित्राचाही समावेश होता.

काय आहे या चित्रात?

या चित्रात अमृता एक पूर्ण चित्रकथाच सांगताना दिसतात.  एका बाजूला एक स्त्री नववधूची वेणी घालत आहे, तर दुसऱ्या बाजूला किशोरवयीन मुलगी जास्वंदाच्या फुलांचं निरीक्षण करत आहे. या तीन मुख्य पात्रांखेरीज इतर दोन स्त्रिया, सोबत एक कुत्रा आणि एका कोपऱ्यात गप्पा मारण्यात गर्क असलेल्या स्त्रियाही चित्रात दिसत आहेत.

हे चित्र अमृता शेरगिल यांनी त्यांच्या गोरखपूर येथील घरी असताना चितारलं होतं. या चित्रात ठासून भरलेल्या आशयामुळे हे चित्र खास ठरतं. या चित्राचं दुसरं महत्त्व म्हणजे हे चित्र त्या काळातलं आहे जेव्हा अमृता शेरगिल आंतराराष्ट्रीय बाजार पेठेत नुकतंच पदार्पण करत होत्या.

 

अमृता शेरगिल यांचं आयुष्य अवघं २८ वर्षांचं होतं. त्यांनी या छोट्या आयुष्यातही जगासमोर उदाहरण ठरतील अशा कालाकृत्या निर्माण केल्या. त्यांच्या लहानशा कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यावर काढलेलं चित्र म्हणूनही या चित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जाता जाता अमृता शेरगिल यांच्या सर्वोत्तम अशा ५ चित्रांना वाचकांपुढे ठेवत आहोत. ही चित्रे तुम्हाला कशी वाटली हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

 

१. तीन मुली

हे चित्र १९३४ साली अमृता युरोपवरून भारतात परतल्यावर काढलेलं पाहिलं चित्र आहे. १९३७ साली Bombay Art Society च्या प्रदर्शनात या चित्राला गोल्ड मेडल मिळालं होतं. असं म्हणतात की १९३४ सालानंतर अमृताची चित्रकला बदलली; तीन मुलींचं हे चित्र त्या बदललेल्या चित्रकलेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. या चित्रात तीन भारतीय स्त्रिया आपल्या नशिबाचं चिंतन करताना दिसत आहेत. या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे या तीन मुलींच्या नशिबाने त्यांच्यापुढे जे वाढून ठेवलं आहे त्याचे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले पडसाद दाखवताना अगदी साध्या पद्धतीचा वापर केलेला दिसतो. अमृताने पुढे जाऊन याच स्टाईलला वाहून घेतलं.

२. नववधूचे प्रसाधन (Bride's Toilet)

हे चित्र स्त्रियांच्या प्रसाधनावेळचं आहे. वधूचे मेंदीयुक्त हात, एका सखीच्या हातातला हळद किंव चंदनाचा कुंडा, केशसंभार हाताळणारी आणखी एक सखी आणि बाजूला बसलेली मुले हे एखाद्या लग्नघरातलं प्रातिनिधिक चित्र म्हणता येईल. हे चित्र चितारताना अमृतांनी अजिंठा मधल्या भित्तीचित्रांवरून प्रेरणा घेतली होती असं म्हटलं जातं.

३. सेल्फ पोट्रेट

यात दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः अमृता आहेत. त्यांनी हे चित्र १९३० साली काढलं होतं.

४. हंगेरियन जिप्सी गर्ल

हे चित्र त्यांनी १९३२ साली हंगेरीत सुट्ट्यांवर असताना चितारलं होतं. 

५. कथाकार

हे चित्र १९४० सालातलं आहे. चित्रात एक वृद्ध माणूस तीन मुलांना कथा सांगताना दिसतोय. शेजारी एक वृद्ध महिला जेवण बनवताना दिसत आहे. अमृता शेरगिलने आपल्या पुढील काळात भारतीय लोकांच्या जीवनावर लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. या काळातली त्यांची चित्रे त्यावेळच्या भारतीय समाजाला अस्सल पद्धतीने आपल्या समोर ठेवतात. हे सिद्ध करण्यासाठी बोनस म्हणून आणखी एक चित्र तुमच्या समोर ठेवत आहोत.

बाजाराला निघालेले दक्षिण भारतीय लोक:

 

कशी वाटली ही चित्रे? या अस्सल भारतीय कलाकाराला एक सलाम तर झालाच पाहिजे.

सबस्क्राईब करा

* indicates required