computer

फक्त फोन नंबरच्या आधारे तुमचं व्हाॅट्सअप सस्पेंड होऊ शकतं? हे कसं शक्य आहे?

व्हाॅट्सअप हे मेसेंजर रोजच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. काही दिवसांपूर्वी हे मेसेंजर नवीन अटी नियम यामुळे कसे असुरक्षित आहे याबद्दल खूप माहिती समोर आली होती. तो वाद संपतो ना संपतो तोच व्हाट्सअपमध्ये एक नवी त्रुटी समोर आली आहे. कोणतीही व्यक्ती तुमचं व्हाट्सअप अकाउंट सस्पेंड करू शकतो. हॅकर किंवा तुम्हाला माहिती नसलेली व्यक्ती तुमचे अकाउंट सस्पेंड करू शकते. त्यासाठी हॅकरला फक्त तुमच्या फोन नंबरची गरज लागेल. कसे होते अकाऊंट सस्पेंड हे आज समजून घेऊयात.

लुफोल सिक्युरिटीमधील संशोधक लुइस मर्केज कार्पेन्थो आणि अर्नेस्टो कॅनालिस पेरेना यांनी याचा शोध लावला. त्यांनी व्हाॅट्सअप मधली ही  मोठी त्रुटी शोधून काढली ज्यामध्ये युजरच्या परवानगी शिवाय त्यांचं खातं निलंबित होऊ शकते. यासाठी हॅकर्सना फक्त युजरच्या फोन नंबरची गरज लागते. तुमचा नंबर मिळाल्यावर हॅकर खाते सस्पेंड करू शकतो, पण तुमच्या खात्यात तो प्रवेश करू शकणार नाही. तसेच तो खाजगी चॅट आणि संपर्कही उघडू शकत नाही.

हॅकर्स नक्की काय करतात?

नंबर मिळवल्यावर हॅकर्स त्यांच्या डिवाइसमध्ये व्हाॅट्सअप डाउनलोड करतात. त्यानंतर त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकासह लॉगिन करण्याचा प्रयत्नही करतात. पण लॉगिन सहज होत नाही, कारण चुकीचा पासवर्ड असतो. तीनदा चुकीच्या कोड टाकला तर बारा तासांसाठी अकाउंट लॉक होतो. याचा अर्थ हॅकर्स आणि यूजर दोघेही अकाउंट वापरू शकत नाही. एकदा अकाउंट लॉक झाल्यावर हॅकर एक नवा ईमेल तयार करतो आणि support.whatsapp.com या साईटवर अकाउंट डीऍक्टिव्हेट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतो. डीऍक्टिव्हेट करण्यासाठी कारण सांगताना फोन चोरी झाला आहे हे कारण सांगण्यात येतं. 

फक्त ज्या उजरने टू स्टेप व्हेरिफिकेशन ठेवले असेल तर त्याचे अकाउंट अश्या प्रकारे सस्पेंड करता येत नाही. कारण त्यांना व्हेरीफिकेशनसाठी कॉल येतो. मग हॅकरला काही करता येत नाही.

'फोर्ब्स' च्या एक रिपोर्टनुसार हे सांगण्यात आले आहे की, व्हाॅट्सअपकडे असे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यात काही मोबाईल क्रमांकही आहेत. हे मोबाईल क्रमांक यूजरचे आहेत की हॅकर्सचे हे कळत नाही. कारण युजरच्या बाबतीत कंपनी कडून फॉलोअप घेतले जात नाही. मग या परिस्थितीत ऑटोमेटेड प्रोसेस ट्रीगर होते आणि युजरचे अकाउंट लगेच बंद होते म्हणजे सस्पेंड होते. त्यानंतर एक तासाने यूजरला अकाऊंट बंद झाल्याचा मेसेज मिळतो. फक्त ज्याने टू स्टेप व्हेरिफिकेशन केले असेल त्याला हा मनस्ताप होत नाही. 

व्हॉट्सअपची ही त्रुटी नक्कीच गंभीर परिणाम करू शकते. या संदर्भात व्हॉट्सअपला कठोर कारवाई करण्याची  गरज आहे. यासाठी पुढे कुठले पाऊल उचलले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required