चष्मा घालवण्यासाठी १० रामबाण उपाय!!!

मोबाईलचा वाढता वापर, कामानिमित्त तासंतास कम्प्युटर स्क्रीन समोर बसणं, टीव्ही पाहणं, झोप पूर्ण न होणं अशा अनेक कारणांमुळं लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना चष्मा लागल्याचे दिसून येते. हल्ली चष्म्याच्या कटकटीपासून सुटका मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय, पण हा पर्याय महागडा असल्याने सर्वांनाच ते परवडेल असे नाही. आयुर्वेदात असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळं काही दिवसातच तुमच्या चष्म्याचा नंबर कमी करता येतो.

कोणते आहेत हे उपाय ?...चला जाणून घेऊया...

१.    एक चमचा बडीशोप, २ बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखरची एकत्र पूड करून ते मिश्रण एक ग्लास दुधासोबत प्या.

२.    रोज ग्रीन टी प्या. ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.

३.    रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या खा, याने दृष्टी सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

४.    ६ ते ७ बदाम रोज रात्री भिजत ठेवा आणि सकाळी ते खा.

५.    त्रिफळा रात्री भिजवून ठेवा आणि त्याच्या पाण्याने सकाळी डोळे धुवा.

६.    अक्रोडच्या तेलाने डोळ्यांच्या चारही बाजूंना मसाज केल्याने फायदा होईल.

७.    जिरे आणि खडीसाखर यांचे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या

८.    ३ ते ४ हिरव्या वेलची आणि एक चमचा बडीशोप एकत्र वाटून ते मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.

९.    तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.

१०.    गाजराचा ज्यूस हा डोळ्यांसाठी गुणकारी असल्याने रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस प्या.
 

सबस्क्राईब करा

* indicates required