computer

अझरबैजानमध्ये गॅस आणि तेल भांडाराला लागलेल्या आगीला ज्वालामुखी कारणीभूत कसा? काय आहे हे प्रकरण?

Subscribe to Bobhata

गेले 2- 3 दिवस समुद्रात दिसत असलेल्या आगीची चर्चा आहे. समुद्रात आग लागणे ही काय नेहमीची गोष्ट नाही. साहजिकच या विषयाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. यामागे असणारी कारणे आता बाहेर येऊ लागली आहेत.

कॅस्पियन समुद्राजवळ पूर्वी रशियात आणि आता स्वतंत्र असलेला अझरबैजान नावाचा देश आहे. फॉर्म्युला वन रेसेस पाहात असाल तर हा देश तुम्हांला माहित असण्याची शक्यता आहे. या अझरबैजानच्या प्रचंड मोठ्या गॅस आणि तेल भांडाराजवळ मोठा स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा तिथून निघताना दिसत होत्या. हा स्फोट चिखलाच्या ज्वालामुखीमुळे झाला असल्याचे आता समोर येत आहे. कॅस्पियन समुद्रात असे अनेक चिखलाचे ज्वालामुखी आहेत. आपल्याला नेहमीचे लाव्हारसाचे ज्वालामुखी माहित असतात. पण हे चिखल ज्वालामुखी काय आहेत?

थोडक्यात सांगायचं तर चिखल ज्वालामुखीतून माती आणि ज्वलनशील गॅस बाहेर पडत असतात. मड वॉल्केनो हा नावाप्रमाणेच चिखलाशी संबंधित आहे. हा चिखल जमिनीखाली पाणी खनिजे आणि ज्वलनशील गॅसेसचा बनलेला असतो. इतर ज्वालामुखीत आणि या ज्वालामुखीत असलेला फरक म्हणजे हा ज्वालामुखी इतर ज्वालामुखीप्रमाणे आग न ओकता जमिनीखालील तप्त पाणी, खनिजे खडके यांचे मिश्रण करून चिखल रुपात बाहेर फेकत असतो

अझरबैजानमधल्या या स्फोटामुळे कुणालाही इजा झालेली नाही. तसेच तेल खाणीचेही नुकसान झालेले नाही. अझरबैजानची राजधानी बाकुपासून ७५ किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला. हे ठिकाण उमिड नावाच्या गॅस एजन्सीपासून अवघ्या १० किलोमीटरवर आहे. सतत दोन तीन दिवस आकाशात आगीच्या ज्वाळा दिसत असल्या तरी यातून कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. चिखल बाहेर पडणाऱ्या ज्वालामुखीतून एवढी आग कशी लागली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग घडून आली असा अंदाज लावण्यात आला आहे.

जगात असलेल्या हजारो चिखल ज्वालामुखींपैकी तब्बल ४०० ज्वालामुखी हे अझरबैजानमध्ये आढळून येतात. अझरबैजानच्या याच सर्व विशेषतेमुळे या देशाला आगीचा देश म्हणून ओळखले जाते. अझरबैजानमधील चिखल ज्वालामुखीं हे जगातले सर्वात मोठे आणि विध्वंसक ज्वालामुखी म्हणून ओळखले जातात.

दरवर्षी यांच्यापैकी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट झालेला आढळून येत असतो. याच कारणाने कधीकधी मोठ्या आगीही ठिकठिकाणी लागत असतात. मेक्सिकोच्या खाडीत महासागराच्या पृष्ठभागावर या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती आहे. सतत ५ तास आग सुरू असताना ही आग मात्र विझवण्यात आली होती. पाण्यात असलेल्या पाईपलाईनमधील गॅस लीक झाल्याने ही आग लागली होती.

अशाप्रकारे सुरुवातीला समुद्रातील आगीविषयी तयार झालेल्या शंकाकुशंका दोन तीन दिवसांनंतर नाहीशा झाल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required