बजाज कंपनीला कारचे वावडे  : जणू कोल्ह्याला द्राक्षे आंबट...

Subscribe to Bobhata

 बजाज... बजाज म्हणजे आपली नेहमीची काळी-पिवळी रिक्षा. बजाज म्हणजे आपली पहिली-वहिली एम-80! आणि बजाज म्हणजे आपली स्टायलिश पल्सर!!

आपल्या या दोन आणि तीन चाकी अॉटो उत्पादनांच्या जोरावर बजाजनं जनसामान्यांच्यात आपली ओळख आतापर्यंत तरी टिकवून ठेवलीय खरी. पण ही पत आणखीन वाढवण्याचा मानस मात्र या कंपनीचा दिसत नाही.

          राजीव बजाज, बजाज ऑटोचे मॅनेजिंग डायरेक्टर. जेव्हा त्यांना बजाजच्या कार निर्मितीबाबत विचारलं गेलं तेव्हा या साहेबांनी क्लिअर करून टाकलं, "आमची कंपनी ही कार विरोधी आहे." पण का ? यांच्या या धोरणाची कारणंही भलतीच बेचव आहेत...

          राजीव बजाज म्हणतात, "लोकांनी एकतर चालायला हवं, किंवा सायकल, दोन चाकी आणि तीन चाकी वाहनांचा वापर करायला हवा. कार या खूपच मोठ्या आणि वेगवान असतात, त्या प्रदूषण करतात, गर्दी करतात आणि दुचाकीवाल्यांना ठार मारतात. आमची कंपनी ही कार विरोधी आहे." 

         आता कार प्रदूषण वगैरे करते इथपर्यंत ठीक आहे राव... पण म्हणून काय तुम्ही स्वतः कार वापरायच्या थोड्याच बंद केल्या? तेव्हा उगाच अशा या उलटसुलट सबबी सांगून आपला हलकेपणा कशाला लपवायचा? आणि काय हो राजीव बजाज, "क्वाड्रीसायकल" या नावाखाली कार बनवायचा प्रयत्न तुम्हीच केला होतात ना?  

राजीव बजाज त्यांच्या क्वाड्रीसायकल सोबत. (स्त्रोत)

कदाचित यालाच म्हणतात... कोल्ह्याला द्राक्षं आंबट!!

सबस्क्राईब करा

* indicates required