बँकेने चुकून पाठवलेले साडेपाच लाख परत न करण्यासाठी या माणसाने दिलं विचित्र कारण!! तुम्हांला तरी पटतं का पाहा..

असे अनेकवेळा होते असे की आपल्याला पैसे एकाला पाठवायचे असतात आणि पाठवले जातात दुसऱ्यालाच. मग त्याच्या विनवण्या करून ते पैसे परत मागवावे लागतात. अशावेळी समोरची व्यक्ती त्याच्या खात्यात आलेले पैसे सहजासहजी देत नाही. याचा अनुभव बिहारमध्ये एकाला आला, पण यावेळी समोरच्या व्यक्तीने दिलेले कारण मात्र भयंकर होते.

बिहारमधील खगरिया जिल्ह्यातल्या ग्रामीण बँकेने चुकून साडेपाच लाखांची रकम बख्तीयारपूर येथील रणजित दास यांना पाठवली. त्याना बँकेने पैसे परत करण्यासाठी अनेक नोटीसी पाठवल्या, पण ते काही बँकेला जुमानत नव्हते. आपण ते पैसे खर्च करून टाकले असे ते सांगत.

शेवटी बँकेला पोलीस स्टेशन गाठावे लागले. त्यावेळी मात्र पोलिसांनी त्याला शिस्तीत विचारल्यावर त्याने पैसे परत न करण्याचे कारण सांगितले. ते कारण ऐकून मात्र हसावे की रडावे असे सर्वांना झाले. रणजितदासच्या म्हणण्यानुसार त्याला हे ५ लाख पंतप्रधान मोदींनी पाठवले आहेत असे वाटले.

मोदींनी सांगितलेल्या १५ लाखांच्या रकमेपैकी हा पहिला हफ्ता आपल्याला आला असे वाटल्याने आपण पैसे परत केले नाहीत असे कारण पठ्ठ्याने पोलिसांना दिले. सध्या त्याला अटक करण्यात आली असून भाऊ जेलची हवा खात आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required