बोभाटा अनसॉल्व्ड मिस्ट्रीज: जॉन एफ केनडी यांचा मृत्यू कसा झाला?

Subscribe to Bobhata

जगातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा अचानक मृत्यु झाल्यावर या मृत्युमागे काहीतरी काळेबेरे असल्याच्या चर्चा सुरु होतात. या चर्चा केवळ अफवा असतात असे नव्हे. पण प्रत्येक प्रकरणात काही प्रश्नांची उकल होत नाही. संशयाला वाव देणारे अनेक प्रसंग या निमित्ताने जनतेच्या समोर येतात. अनेक चौकशी आयोग नेमले जातात. साक्षी पुराव्यांची पुन्हा एकदा तपासणी केली जाते. सर्व बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जाते. काही संधीसाधू त्याचा वापर करण्यासाठी पुढे सरसावून येतात. 'अंदरकी बात', ' कट कारस्थान', ' परकीय शक्तींचा हात ' अशा सर्व साधारण चर्चेपासून ' परग्रहावरून आलेली काही माणसे' अशा खुळचट कल्पनेपर्यंत शक्य तितक्या वावड्या उडत राहतात. डावे -उजवे,  साम्यवादी-भांडवलशाही-सरकार-मिडीया-परकीय शक्ती-फ्री मेसन्स- इल्युमिनाटी काही असे सगळेच आरोपी असल्याचा दावा केला जातो. काही दिवस चर्चा होतात आणि नाहीशा होतात. 

अशाच काही खळबळजनक चर्चांचा आढावा आता आपण बोभाटा.कॉमच्या 'अनसॉल्व्ड मिस्टरीज' या व्हिडिओ मालिकेत घेणार आहोत. 
अमेरिकेत काही खुट्ट झालं की त्याची जगभर लगेच दखल घेतली जाते. मग तिथं काही खळबळजनक झालं तर काय विचारायलाच नको!  आपण पाहणार आहोत जगात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या घटनांपैकी एक घटना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन  एफ. केनेडी यांच्या खुनाची घटना. २२ नोव्हेंबर १९६३ साली घडलेल्या या घटनेला यावर्षी ५८ वर्षे पूर्ण होतील. अजूनही नक्की काय झालं याचा शोध लागला नाही, पण त्या अनुषंगानं बरंच काही समोर आलं होतं. 
या व्हिडिओत  आमचे जाणकार श्री. रामदास या घटनेचे सर्व पैलू तुमच्यासमोर मांडत आहेत. तुम्हांला यांतल्या कोणत्या थेअरीज माहित होत्या सांगा बरं..

सबस्क्राईब करा

* indicates required