कार्ट्यानं लिफ्टच्या बटनावर सोडली ‘धार’....पुढं काय झालं बघा की राव !!

मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या अंगात की नई एक किडा असतोया. हा किडा आपल्याला कधीबी गप बसू देत नाय. आता काय लोकांच्या मधी हा किडा छोटा असतोय अन काहींच्या मधी भला मोठा. असली लोक नको तिथं ‘उंगली’ करत फिरतात. याची लक्षनं ल्हानपनापासून दिसत असतात राव.

आज आम्ही तुम्हास्नी एक व्हिडीओ दाखवणार हाय. त्यात चायना मधलं एक कार्टं काय करतंय ते एकदा बघाच.

मी म्हनतो हे मुल ज्याचं हाय त्यानं याला खुलं सोडलंच कसं. आता माणूस लिफ्ट मधी असला म्हंजी गप बसावं की नाही. पन यानं डायरेक्ट लिफ्टच्या बटनांवरच ‘धार’ सोडली राव. धार सोडून याला सुपरमॅन झाल्या सारखं वाटलं, पन त्याने जे केलं ते त्यालाच भोगावं लागलं. लिफ्टची बटनं खराब झाली, आत शोर्ट सर्किट झाला अन लिफ्ट बंद पडली. हे कार्टं रडाया लागलं. मग माणसांनी येऊन याला वाचवलं.

नंतर ह्ये बेनं म्हनतंय कसं ‘मी काय बी केलं नाय’. याचे आय बाप भी म्हटले ‘आमच्या पोराला एवढा पराक्रम जमनारच नाय’. पन त्यांना म्हयतच नव्हतं की हे सगळं शिशीटीव्ही मंधी रोकोर्ड झालंय. आता झालेलं नुसकान त्याचं आय बाप भरणार हायत म्हणे.

नको तिथे किडे करू नये भाऊ, नाय तर आपल्याच पायावर कुऱ्हाड बसत असते बघ...कळतंय का ?

सबस्क्राईब करा

* indicates required