computer

कोलकात्यात पैशांचा पाऊस पडलाय....खरी गोष्ट काय आहे ?

लहानपणी पैशांचं झाड असावं, गदगदा हलवून पैसे पाडावेत किंवा गेलाबाजार पैशांचा पाऊस व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं.  पण खरोखरीच असे पैसे काशातून पडायला लागले तर तुम्ही काय कराल, असा विचार कधी केलाय? तुम्ही म्हणाल काय चेष्टा लावलीय!! पण हे खरंय.  कोलकात्यात चक्क आकाशातून पैसे पडले...

कोलकात्यातल्या सेंट्रल बिजनेस डिस्ट्रीक्टमधल्या एका बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरुन अचानक कोऱ्या करकरीत नोटा पडायला लागल्या आणि खाली असलेल्यांची एकच झुंबड उडाली. झाले असे की महसूल म्हणजे शुद्ध मराठीत रेव्हेन्यू खात्यातले काही अधिकारी एका खाजगी ऑफिसमध्ये चौकशीसाठी गेले होते. तर त्या ऑफिसमधून अचानक २०००, ५०० आणि १००अ रुपयांच्या नोटांची बंडले झाडूच्या साहाय्याने खाली फेकण्यात आली. 

ज्या कंपनीत अधिकारी गेले होते ती कंपनी आयात-निर्यात विषयाशी निगडित कंपनी होती आणि तिच्यावर टॅक्स चोरीचा आरोप होता. आता पैशांचा पाऊस पाडूनही तिथले काही अधिकारी या पावसाचा आणि चौकशीचा संबंध आहे की नाही हे सिद्ध व्हायचे आहे असं म्हणत आहेत.. पोलिस असेही सांगत आहेत की चौकशी सुरु आहे आणि नेहमीप्रमाणे चौकशी झाल्यावर सत्य काय ते बाहेर येईल.

सत्य काहीही असले तरी बिल्डिंगच्या खाली असलेल्या लोकांची मात्र सॉलीड दिवाळी झाली!!

सबस्क्राईब करा

* indicates required