काही लोकांना या GIF मध्ये आवाज ऐकू येतोय...तुम्हाला पण येतोय का ?

चला आज एक गम्मत बघूया. खाली एक GIF दिली आहे. ती GIF तुम्ही बघायची आणि ती बघत असताना तुम्हाला काय जाणवलं ते आम्हाला सांगायचं.

स्रोत

बघितली ना ? मुळात GIF मध्ये आवाज नसतो. याही GIFमध्ये आवाज नाही. मग बघताना आवाज आल्याचा भास का होतो ? तुम्हालाही हा अनुभव आला का ? तुमच्यातील काहींना हा भास झाला नसेल, काहींना झालाही असेल. पण या GIF मध्ये काही तरी वेगळं आहे हे मात्र खरंय.

तारांचे जाळे वाहून नेणारे ३ खांब. पहिला आणि शेवटचा खांब मिळून मधल्या खांबांबरोबर तारांनी ‘रोप जंप’ खेळत आहेत. हे चित्र जर स्थिर असतं, तर आपल्याला काही जाणवलं नसतं. पण रोप जंप खेळताना घेतलेल्या प्रत्येक उडीबरोबर चित्र त्याच गतीने हलतं. त्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येत नसला, तरी त्यातील कंपन आपल्याला जाणवतं. हीच खरी गम्मत आहे !!

ही GIF तयार केली आहे @IamHappyToast या ट्विटर युझरने. फोटोशॉप चॅलेंजसाठी त्याने ही GIF बनवली होती. यानंतर जेव्हा ती सोशल मिडीयावर व्हायरल झाली तेव्हा अनेकांनी या सायलंट GIF बद्दल वेगळं मत व्यक्त केलं. याला काहींनी ‘optical illusion for the ears" म्हटलं. म्हणजे कानांसाठी तयार करण्यात आलेला भास!!

मंडळी तुम्ही सुद्धा ही GIF बघितली, तुम्हाला काय जाणवलं ते आम्हाला सांगायला विसरू नका!!

सबस्क्राईब करा

* indicates required