ऐकावं ते नवल...जास्त पगारवाढ झाली म्हणुन आंदोलन !!

आपल्या कडे पगार वाढ, कामाचे तास कमी करणे या साठी आंदोलन, संप करण तसं फार कॉमन आहे. पण आज आम्ही तुमचं लक्ष एका बातमी कडे वेधून घेणार आहोत. कॅनडात म्हणे डॉक्टर लोकांची पगारवाढ झाली आणि त्यावर ते लोक नाराज झाले. आहो पण गंमत तर इथंच आहे. नाराजी चे कारण पगारवाढ जास्तच झाली म्हणे. हे अशक्य आहे !! पैसा कुणाला नको असतो?? ही आमची पण पहिली रिऍक्शन होती. पण मग आम्ही थोडं उत्खनन केलं आणि बातमीच्या मुळापर्यंत पोहचलो.

तर मंडळी झालं अस आहे कॅनडाच्या क्यूबेक प्रातांतल्या 500 डॉक्टरांनी एका पत्रावर सह्या केल्या आहेत. या पत्रात डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना मिळणारा पगार हा पुरेसा आहे आणि त्यांना दिलेला वाढीव पगार सरकारने नर्सेस पेशंट यांच्यासाठी वापरला जावा. नर्स, क्लार्क लोकांना खूप खडतर परिस्थिती मध्ये काम करावे लागते, हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या पेशंटना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. या सगल्याबाबीमुळे डॉक्टरना वाढीव पगार नकोय.

स्रोत

पेशंटला चार दिवस जास्त ऍडमिट ठेऊन पैसे उकळणारी आपल्या कडची कॉर्पोरेट हॉस्पिटल पाहता अशी सेवाभावी वृत्ति क्वचितच पाहायला मिळते. आपल्या कडे अशी परिस्थिती कधी येईल का? का आपल्याला कॅनडात जावं लागेल?? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या तोवर आम्ही सातवा वेतन आयोग कधी लागू होतोय ते शोधतो

सबस्क्राईब करा

* indicates required