computer

चांद्रयानाकडून आला चंद्राचा पहिला फोटो- या फोटोत काय दिसतंय जाणून घ्या..

मिशन मंगल पाहिला का मंडळी??? नाही पाहिला, काही हरकत नाही. सध्या आपलं चालू असलेल्या मिशन चांद्रयानच्या स्क्रिप्ट मध्ये पुढला टप्पा पार पडला आहे. चंद्राच्या कक्षेत यशस्वी फिरणाऱ्या या यानाने आज चंद्राचा पहिला फोटो पाठवलाय. इस्रोने केलेलं हे ट्विट पाहा.

या फोटो सोबत दिलेल्या माहितीनुसार चंद्रापासून २६५० किमी अंतरावरून हा फोटो घेण्यात आला आहे. या फोटोत इस्रो ने दोन मोठी महत्वाची ठिकाणं दाखवली आहेत. अपोलो क्रेटर आणि मरे ओरिएंटल बेसिन ही त्यांची नावं.

(अपोलो क्रेटर)

अपोलो क्रेटर हे चंद्रावर असलेलं एक विवर आहे, तर मरे ओरिएंटल बेसिन म्हणजे चंद्राचा तो भाग ज्याबद्दल आपल्याला लहानपणी वेगवेगळ्या कथा सांगितल्या गेल्या. चंद्राला त्याच्या आईने काजळ लावलं म्हणून त्याच्यावर काळे डाग दिसतात अशी एक गोष्ट सांगितली जायची. हे काळपट डाग म्हणजे बेसाल्ट खडकाचे मैदान आहेत. ते कधीकाळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेत. अशा मैदानांना ‘लुनार मरे’ म्हणतात. मरे ओरिएंटल बेसिन हे देखील चंद्राचं बेसाल्ट मैदान आहे.

(मरे ओरिएंटल बेसिन)

मंडळी, २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान-२ ११८x४४१२ किलोमीटर या गतीने चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. सोप्या भाषेत चांद्रयान-२ चंद्राला प्रदक्षिणा घालून हळूहळू चंद्राच्या जमिनीवर उतरेल.

पुढच्या २ आठवड्यात चांद्रयान चंद्राच्या आणखी जवळ जाईल. म्हणून पुढचे काही दिवस कसरतीचे असतील. अशा प्रकारे २ सप्टेंबर रोजी विक्रम लँडर यानापासून वेगळं होईल आणि ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमिनीवर उतरेल.

तर मंडळी, या प्रवासात असे क्षण येतच राहतील आणि ते आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवत राहू. तूर्तास चंद्राचा पहिला फोटो कसा वाटला हे नक्की सांगा !

सबस्क्राईब करा

* indicates required